सराईत आरोपींकडुन मिनी गंठणसह 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त;दोघांना अटक;श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी

श्रीरामपूर:
श्रीरामपूर शहरातील दोन सराईत आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी शिताफीने अटक करून त्यांच्या ताब्यातून सोन्याच्या मिनी गंठणसह सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,दिनांक 06/07/2025 रोजी दुपारी 02/15 वा. सुमारास यातील फिर्यादी मिना विजय वाबळे, वय 42 वर्ष, धंदा- घरकाम, रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं 7. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर या त्यांच्या घरी जात असताना त्यांच्या पाठीमागुन एक काळया रंगाच्या मोटारसायकलवर (स्पोर्ट बाईकवर) दोन अनोळखी इसम जोरात आले.त्यांनी फिर्यादी जवळ गाडी हळू केली.त्यातील पाठीमागे बसलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळयातील 80 हजार रुपये कि.चे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने महिलेला मारहाण करुन हिसकावले.तेव्हा या महिलेने त्यांना विरोध केला.त्यावर चोरट्यांनी त्या महिलेला चापटीने मारहाण केली.त्यांच्याशी झटापट केली त्यामुळे महिलेच्या मानेला मोठी जखम होऊन दुखापत झाली. त्यांनतर चोरटे गाडी जोरात घेऊन तेथुन निघुन गेले.याबाबत महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 655/2025 बी.एन.एस. कलम 309(6), 3(5) प्रमाणे दिनांक 06/07/2025 रोजी गुन्हा दाखल केला.
सदरचा गुन्हा दाखल होताच पो.नि. नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्हयातील अनोळखी आरोपीचा व गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ सदर गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. त्याचवेळी गुप्तबातमीदाकडुन पथकास माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील वर्णनाचे दोन जण हे गायकवाड मराठी शाळा वॉर्ड नं.01, श्रीरामपूर येथे बसलेले आहेत.पोलिसांनी सदर ठिकाणी जावुन त्याचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शाहरुख ऊर्फ चपट्या अफरस शेख, वय 32 वर्षे, रा. जिनींग प्रेस बस स्टॅण्डच्या मागे, वॉर्ड नं. 06, श्रीरामपूर व ज्ञानेश्वर ऊर्फ पेटी संताराम मोरे, वय 21 वर्षे, रा. इंद्रानगर वॉर्ड नं.01, श्रीरामपूर जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे सदर गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदरचा गुन्हा नमुद आरोपिंनी केला असल्याची पोलीस पथकाची खात्री झाली. तेव्हा सदर आरोपींना नमुद गुन्हयात अटक करुन न्यायालयासमक्ष हजर केले. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केल्याने त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी नमुद गुन्हा केला असल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून नमुद गुन्हयातील 80,000/- रु. किंमतीची 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण,1,00,000 रु. किंमतीची सदरचा गुन्हा करताना वापरलेली टी.व्ही.एस. कंपनीची काळया, निळया रंगाची रायडर मोटारसायकल (MH-17,CY-3034) असा एकूण 1,80,000/-रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोहेकॉ दादासाहेब लोढे, पोहेकॉ प्रदिप साठे, पोकों/अमोल पडोळे, पोकों संभाजी खरात, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/अजित पटारे, पोकॉ/सचिन काकडे, पोकों/सागर बनसोडे, पोकों/आजिनाथ आंधळे, मपोकों/ मिरा सरग यांनी केली. दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा  पोलीस उपनिरीक्ष समाधान सोळंके हे करीत आहेत.

श्रीरामपूर शहरातील दोन सराईत आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News