श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात महाआरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम ह.भ.प. सोपान महाराज हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले आणि माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या नियोजनातून आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव यांच्या हस्ते विठ्ठलाची महाआरती पार पडली. महाआरतीनंतर सर्व उपस्थित भक्तांना खिचडी व राजगिरा लाडूचा प्रसाद वाटण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपक क्षत्रिय यांच्या प्रवचनाने झाली. यानंतर ह.भ.प. बबन महाराज अनाप, ह.भ.प. अशोक महाराज शिरसाठ, विलास नाना मेहत्रे व किरण महाराज गागरे यांनी भक्तिगीत व भजन सादर करून वातावरण भक्तिमय केले. पौरोहित्य हरिहर काळे गुरु व बापू गुरु देवकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमान्य प्रतिष्ठान व महिला मंच, हरिहर शेजआरती मंडळ, सत्यमेव जयते ग्रुप, साई क्लासेस यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी ह.भ.प. सोपान महाराज हिरवे, बबन महाराज अनाप, अशोक महाराज शिरसाठ, किरण महाराज गागरे, विलास नाना मेहत्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, बेलापूर पोलीस औट पोस्टचे संपत बडे, नंदकिशोर लोखंडे, आदिनाथ आंधळे, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मीना साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, तसेच जालिंदर कुऱ्हे, रणजित श्रीगोड, भाऊसाहेब कुताळ, भास्कर खंडागळे, कनजीशेठ टाक, सुधाकर तात्या खंडागळे, दिलीप काळे, पुरुषोत्तम भराटे, देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, दिपक क्षत्रिय, सुहास शेलार, रमेश दायमा, सुभाष सोमाणी, सुरेश बाबुराव कुऱ्हे, महेशजी जेठवा, गोविंद श्रीगोड, डॉ. सुधीर काळे, लक्ष्मणराव मुंडलिक, बाबासाहेब काळे, सोमनाथ लगे, सोमनाथ साळुंके, राधेश्याम अंबिलवादे, आदी मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावकरी मंडळ आणि सर्व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले.
