माळवाडगाव येथे पंचदिवशीय कीर्तन महोत्सवास उत्साहात प्रारंभ

श्रीरामपूर –तालुक्यातील माळवाडगाव येथे धर्मध्वजाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पंचदिवसीय कीर्तन महोत्सवाला भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली. स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांच्या...

श्रीरामपूर –
तालुक्यातील माळवाडगाव येथे धर्मध्वजाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पंचदिवसीय कीर्तन महोत्सवाला भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली. स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कविराज महाराज झावरे (पारनेर) यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविकांना भक्तिरसात तल्लीन केले.
माळवाडगावचे ग्रामदैवत असलेल्या भवानी देवी मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थांनी चार वर्षांपूर्वी ७५ फूट उंचीचा धर्मध्वज उभारला आहे. या धर्मध्वजाच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी पंचदिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही महंत भास्करगिरी महाराज व महंत रामगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दि. १७ एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक गिरिधर आसने, युवा नेते निरज मुरकुटे, भाजपा तालुका सरचिटणीस डॉ. शंकरराव मुठे, माजी संचालक बबनराव मुठे, तसेच सारंगधर आसने, नानासाहेब आसने, सुदामराव आसने, पत्रकार विठ्ठलराव आसने, भाऊसाहेब काळे, प्रमोद आसने, दिलीपराव हुरुळे, आसने गुरुजी, यशवंतराव हुरुळे, बाबुराव दळे, भाऊसाहेब आसने, सतीश आसने, सुधीर आसने, अमोल मोरे, रावसाहेब काळे, दादासाहेब अनुसे, उद्धव आसने, दत्तात्रय मोरे, स्नेहल काळे, योगेश लटमाळे, राजेंद्र आसने, पोलीस पाटील मधुकर बनसोडे, नितीन बोरुडे, श्रीराम हुरुळे, परमेश्वर गाढे, बापूसाहेब आसने, योगेश आसने, लखन महाराज, कृष्णा महाराज हापसे, बाळासाहेब महाराज पवार, काशिनाथ महाराज टेकाळे, भालदार चोपदार कैतके बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनानंतर झालेल्या कीर्तन सोहळ्यात कविराज महाराज झावरे यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून भक्ती, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला. यावेळी सुभाष बाबुराव आसने व विजय दिनकर आसने यांनी महाराजांचे संत पूजन केले तर सह्याद्री मित्र मंडळ व समस्त भजनी मंडळ, माळवाडगाव यांनी भाविकांना भोजन दिले. यावेळी परिसरातील भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप सोशल मीडिया सेलचे तालुका संयोजक व पत्रकार संदीप आसने यांनी केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!