तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने ‘समाज भूषण...

श्रीरामपूर-
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील यांनी श्रीरामपूरकरांना एक महत्त्वाची ग्वाही दिली – “येत्या ३ महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णआकृती पुतळा उभा करू,” असा शब्द त्यांनी यावेळी दिला. त्याच बरोबर डॉ बाबासाहेबांच्या स्मारकावरून सुरू असलेल्या श्रेयावादाचा देखील आपल्या अनोख्या शैलीतुन समाचार घेतला. यावेळी पुतळा उभारणीच्या कामावरून होत असलेल्या राजकारणावर डॉ. विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “यामध्ये कोणीही श्रेयावादाची लढाई करू नये. समाज बांधवांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन त्यांचा देखील या पूर्णआकृती स्मारक उभारणीत मोठे योगदान आहे. जे काम शिल्लक राहिले आहे, त्यात आमचा खारीचा वाटा असेल. निदान महामानवांना तरी राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवा,” अशी विनंती त्यांनी श्रीरामपूरमधील राजकारण्यांना केली. श्रीरामपूरात उभारले जात असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक हे केवळ एक पुतळा नसून ती बाबासाहेबांप्रती असलेली आस्था असेल, असे सांगताना ते म्हणाले, “हा पुतळा असा देखणा आणि भव्य असेल की, जो कोणी श्रीरामपूरमधून जाईल, त्याच्या मनात बाबासाहेबांबद्दलची निष्ठा अधिक बळकट होईल. आमचा उद्देश स्वच्छ आहे – बाबासाहेबांच्या कार्याला शोभेल असे भव्य स्मारक उभे करणे, हीच आमची प्राथमिकता आहे.” पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “पुरस्कार लहान किंवा मोठा नसतो, देणाऱ्याचे मन पाहून मी कार्यक्रमाला येतो. आज मी इथे पुरस्कार घेण्यासाठी नाही, तर स्मारक समितीने जो पुढाकार घेतला आहे, त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सोहळ्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दीपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मा. नगराध्यक्ष संजय फंड, नाना शिंदे, पक्षप्रतोत वैशाली चव्हाण, नगरसेवक संजय गांगड,रवी पाटील, आशिष धनवटे, मनोज लबडे ,तिलक डुंगरवाल, केतन खोरे, शरद नवले, डॉ शंकर मुठे, भीमराज बागुल, नगरसेवक सिद्धार्थ फंड, रुपेश हरकल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!