शिवमहापुराण कथेत भाविकांच्या गर्दीचा उच्चांक;पंडीत प्रदीप मिश्रा महाराजही भारावले; विखे पाटलांच्या नियोजनाचे कौतुक

श्रीरामपूर-शिर्डीजवळील अस्तगाव शिवारात उभारलेल्या शिवनगरीत सुरु असलेल्या शिवमहापुराण कथेने सध्या अहिल्यानगर जिल्ह्यांसह विविध ठिकाणांहून येत असलेल्या भक्तांना वेड लावले आहे. पाच...

श्रीरामपूर-
शिर्डीजवळील अस्तगाव शिवारात उभारलेल्या शिवनगरीत  सुरु असलेल्या शिवमहापुराण कथेने सध्या अहिल्यानगर जिल्ह्यांसह विविध ठिकाणांहून येत असलेल्या भक्तांना वेड लावले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कथेचे प्रवचन प्रसिद्ध कथाकार सिहोरवाले बाबा अर्थात पंडीत प्रदीप मिश्रा देत आहेत. लाखोंच्या भाविकांच्या उपस्थितीमुळे दररोज गर्दीचा उच्चांक मोडला जात आहे.या विक्रमी गर्दीच्या नियोजनात विखे परिवाराने दाखवलेले व्यवस्थापन आणि नेतृत्व सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. स्वयंसेवकांचे व्यवस्थापन, भोजन, पार्किंग, बैठक व्यवस्था, पंडाल, माईक सिस्टीम, लाईटिंग या सर्व बाबतीत दाखवलेले उत्कृष्ट नियोजन पाहून स्वतः पंडीत प्रदीप मिश्रा महाराजही भावूक झाले. त्यांनी आपल्या निरूपणादरम्यान दररोज विखे परिवाराच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले आहे.दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनात पंडीत प्रदीप मिश्रा महाराज म्हणाले, “विखे पाटील परिवाराने कार्तिक महिन्यात शिवमहापुराण कथा आयोजित करून भाविकांना लाखो अध्यात्मिक यज्ञाचे पुण्य मिळवून दिले.” महाराजांच्या या विधानाने संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय निर्माण झाला. हा अध्यात्मिक यज्ञ  प्राचीन भारतातील एक धार्मिक आणि राजकीय यज्ञ मानला जातो. त्या यज्ञाद्वारे राजा आपल्या साम्राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करीत असे. महाराजांच्या या संदर्भाने कथेचं आध्यात्मिक अधिष्ठान अधिक भव्य स्वरूपात उभं राहिलं असून भाविकांमध्ये या विधानाची मोठी चर्चा रंगली आहे.पंडीत प्रदीप मिश्रा यांनी पुढे सांगितले, “विखे पाटील परिवाराच्या चार पिढ्यांना जनतेचा आशीर्वाद लाभला आहे. आज सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कथा यशस्वीरीत्या पार पडत असून, त्यांच्या नियोजनामुळे लाखो भाविकांना दिव्य अनुभव मिळत आहे. महाराजांनी पुढे म्हटले की, धर्म, समाज, राजकारण आणि आयोजन या सर्व क्षेत्रात सुजय विखे पाटील यांनी समतोल साधला आहे. त्यांनी भक्तीभावातून आयोजन करत सर्व भाविकांचं आशीर्वादरूपी प्रेम मिळवलं आहे.शिर्डी परिसरात लाखोंच्या गर्दीचं नियोजन सुलभतेने करून दाखवल्यामुळे सुजय विखे यांच्या नेतृत्वगुणांची नवी झलक दिसून आली आहे. कथेच्या आयोजनातून विखे परिवाराने समाजातील भक्तिभावाला दिशा दिली असून या आयोजनामुळे शिर्डी परिसरात अभूतपूर्व श्रद्धा आणि शिस्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. पंडीत प्रदीप मिश्रा महाराजांच्या वाणीतून विखे परिवाराचं कौतुक झाल्यानं ही कथा फक्त आध्यात्मिकच नाही तर सामाजिक आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही एक आदर्श ठरत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!