ऊस उत्पादकांनी ऊस परिषदेला उपस्थित रहावे;’स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष ताके यांचे आवाहन

श्रीरामपूर-या वर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशी पिकहातातुन गेले आहे. केवळ ऊस...

श्रीरामपूर-
या वर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशी पिक
हातातुन गेले आहे. केवळ ऊस पिक शेतकऱ्यांचे हातात आहे. त्यामुळे त्यातुन जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी जागृत झाला तर त्याला तसा दर मिळु शकतो,असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश ताके यांनी केले आहे.
ताके यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, साखरेचे दर ४ हजार रुपये क्विंटल पेक्षा जास्त वाढले आहेत.त्याचा फायदा करुन घेण्यासाठी येत्या १६ तारखेला जयसिंगपूर येथे होणार्‍या ऊस परिषदेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मा.खा.राजु शेट्टी यांच्या वतीने मांडण्यात येणाऱ्या ऊस दर ठरावाला अनुमोदन द्यावे.ऊस परिषदेत ठरलेला दर आपल्या जिल्ह्यातील कारखान्यांना देण्यासाठी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही राहील.शेजारच्या पुणे जिल्ह्यातील दर प्रती टन ३ हजार ५०० रुपयांपर्यंत गेलेले आहेत.आपल्याकडे आत्ता कुठे ३ हजार रुपये देऊ असे म्हणत उपकाराची भाषा काही साखर कारखानदार कार्यकर्त्यामार्फत बोलत आहेत. तर काही कारखानदारांनी ऊस दरा बाबत गुळणी धरली आहे.पुण्यात ३५०० शक्य आहे मग आपल्या कारखान्यांना का शक्य नसावा म्हणून हक्काने मागणी करणे गरजेचे आहे.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचेकडे ऊसाच्या वजनाचा काटा मारणार्‍या कारखान्यांची यादी असल्याचे म्हटले आहे. त्याअर्थी ऊस वजनात काटा मारला जात आहे.सदरची यादी आपल्या उपस्थितीत मा.खा.राजु शेट्टी मुख्यमंत्री यांच्याकडे मागण्याचा ठराव करणार आहेत.ज्या कारखान्याला ऊस देणार आहात त्यांचा तोडणी व वाहतूक खर्च साखर आयुक्तांनी किती मंजूर केलेला आहे, याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे कारण तोडणी व वाहतूक खर्च वाढवुन ऊस दरावर दरोडा टाकण्याचा प्रकार होत आहेत.आपल्या ऊसाला जास्तीत जास्त दर मिळवण्यासाठी ऊस परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश ताके यांनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!