मतमाऊली यात्रेत केमिकलयुक्त पेढ्यांच्या विक्रीवर बंदी घाला;रिपाइंचं प्रशासनाला निवेदन

श्रीरामपूर-हरेगाव ख्रिश्चन धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या मतमाऊली यात्रेच्या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबर रोजी हरेगाव येथे भरणाऱ्या यात्रेमध्ये विक्री होणाऱ्या केमिकलयुक्त पेढ्यांविरोधात रिपब्लिकन पक्ष,पॅरिस...

श्रीरामपूर-
हरेगाव ख्रिश्चन धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या मतमाऊली यात्रेच्या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबर रोजी हरेगाव येथे भरणाऱ्या यात्रेमध्ये विक्री होणाऱ्या केमिकलयुक्त पेढ्यांविरोधात रिपब्लिकन पक्ष,पॅरिस कौन्सिल वतीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना निवेदन देत, यात्रेच्या ठिकाणी प्रसाद म्हणून विकले जाणारे पेढे खव्याचे नसून केमिकलयुक्त असल्याचा गंभीर आरोप केला.निवेदनात म्हटलं आहे की, या केमिकलयुक्त पेढ्यांमुळे भाविकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. मागील वर्षी अनेक भाविकांना पेढे खाल्ल्यानंतर त्रास जाणवला होता. त्यामुळे यंदा अन्न प्रशासन व पोलीस प्रशासनाने योग्य ती तपासणी करून अशा पेढ्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
जर प्रशासनाने वेळेवर योग्य पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्रिभुवन यांनी दिला.यावेळी माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, पॅरिस कौन्सिलचे अध्यक्ष कमलाकर पंडित, लकीशेठी, सुरेश ठुबे, सुनील सोनवणे, विलास बनसोडे, विजय त्रिभुवन दीपक कदम, शरद पंडित, मनोज कुमार गायकवाड, राजेंद्र त्रिभुवन, प्रतीक गायकवाड, सुवर्णा बोधक, प्रतिभा पंडित, संगीता पंडित, लता बनसोडे, त्रिभुवन विना दुशिंग आदींची उपस्थिती होती.
मतमाऊली यात्रेत लाखो भाविकांचा सहभाग असतो. त्याच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. त्यामुळे केमिकलयुक्त पेढ्यांची विक्री थांबवून भाविकांना सुरक्षित प्रसाद मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रशासन काय पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना निवेदन दिले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!