श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहर पोलिसांनी आज एकलहरे परिसरात छापा टाकून राज्यात विक्री करण्यास प्रतिबंधीत असलेला सुमारे 2 लाख रुपये किंमतीचा विमल केसरयुक्त पान मसाला व तंबाखू जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी अमजद नौशाद सय्यद, 30 वर्षे, रा. आटवाडी, एकलहारे, ता. श्रीरामपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की आज गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राज्यात प्रतिबंदीत असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखू असा मुद्देमाल आटवाडी,एकलहरे ता. श्रीरामपूर येथे अमजद नौशाद सय्यद हा विक्री करण्याच्या इराद्याने स्वतः च्या ताब्यात बाळगून आहे.सदर बातमीची शहानिशा सपोनि जाधव व पोलीस पथक यांनी केली असता प्रतिबंधित असलेला विमल केसरयुक्त पान मसाला व तंबाखू आरोपी अमजद नौशाद सय्यद याच्या घराच्या पोर्चमध्ये पोलीस पथकास मिळून आला. तसेच आरोपीच्या घरात देखील मुद्देमाल आहे असा संशय असल्याने आरोपीचे बंद घर दोन पंचांसमक्ष व आरोपीचा भाऊ हमीद सय्यद यांच्या समक्ष उघडले असता घरात देखील प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आला असून सदर मु्देमाल दोन पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच अन्न औषध प्रशासन अधिकारी राजेश बडे यांना कारवाईची फोनद्वारे माहिती दिली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पोलिसांनी 2,06,184 रु किमतीचा सुगंधित विमल पान मसाला जप्त केला असून अमजद नौशाद सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
