पाटबंधारे वसाहतीच्या पडक्या खोलीत तरुणाचा मृतदेह;दोन महिन्यांपासून होता बेपत्ता

श्रीरामपूर-श्रीरामपूर येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका बंद आणि पडक्या खोलीत एका तरुणाचा मृतदेहकुजलेल्या अवस्थेत आढळला. महेश डोरले असे या तरुणाचे नाव...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका बंद आणि पडक्या खोलीत एका तरुणाचा मृतदेह
कुजलेल्या अवस्थेत आढळला. महेश डोरले असे या तरुणाचे नाव होते.गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.सदर मृतदेह इतका कुजला होता की, तो ओळखणे पोलिसांनाही अशक्य होते.पोलिसांनी अथक प्रयत्न करून तब्बल चार तासात मृताची ओळख पटवली. तसेच मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने शीर धडापासून वेगळे झालेले होते.  
ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना समोर आल्याने शहरात शोककळा पसरली आहे. ५ जुलै रोजी गोंधवणी रोड, वॉर्ड नं. १ येथील रहिवासी असलेला महेश डोरले हा युवक अचानकपणे बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी ६ जुलै रोजी महेश बेपत्ता झाल्या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र महेशचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर, दोन महिन्यांनंतर त्याचा मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमधील एका पडक्या खोलीत त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिखरे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, महेशने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. मात्र, मृतदेह पूर्णपणे कुजल्याने या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

मृत तरुण
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!