तुमच्या ताटातले काढुन दुसऱ्याला देणार नाही-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे;अकोले येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विराट रॅली व शेतकरी मेळावा

श्रीरामपूर-आदिवासी समाजाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे तुमच्या ताटातले काढून घेण्याचे काम सरकार अजिबात करणार नाही. तसेच राघोजी...

श्रीरामपूर-
आदिवासी समाजाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे तुमच्या ताटातले काढून घेण्याचे काम सरकार अजिबात करणार नाही. तसेच राघोजी भांगरे आणि राया ठाकर यांच्या स्मारकांची दुरुस्ती करण्यासाठी जो निधी लागेल तो नक्की देण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले येथे काढण्यात आलेल्या आदिवासी समाजाच्या रॅलीमध्ये सहभागी होऊन त्यानंतर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला संबोधित केले. या विराट रॅलीमध्ये ठिकठिकाणी फुले उधळून उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच जागोजागी लाडक्या बहिणींनी शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे, डॉ.जालिंदर भोर, कमलाकर कोते, जगन देशमुख, बाळासाहेब भोर, सुशांत गजे, संजय वाघचौरे, शर्मिला येवले, संजय जाधव, जावेद जहागिरदार, सुभाष येवले, महेश देशमुख आणि या सोहळ्याचे मुख्य आयोजक मारुती मेंगाळ तसेच शिवसेना सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि आदिवासी बंधू भगिनी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की,जागतिक आदिवासी दिन हा या समाजासाठी दसरा दिवाळीसारखा आहे. त्यामुळे आजच्या दिवशी मी इथे आलो आहे.आपली ही संस्कृती हाच आपला अभिमान आहे. त्याचे दर्शन आज इथे पहायला मिळाले. त्यामुळे आपल्याला थांबविणारी कोणतीही शक्ती नाही, असे यावेळी त्यांनी  निक्षून सांगितले.विधानसभा निवडणूक आपण जिंकणार आणि यांना (एकनाथ शिंदे) जेलमध्ये टाकू, बर्फाच्या लादीवर झोपवू हे सगळं ते बोलले. मात्र, माझ्या आदिवासी समाजातील लाडक्या बहिणींनी त्यांच्या चारी मुंड्या चित करून टाकल्या. महाविकास आघाडीला घरी पाठवून दिलं,” अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना करुन दिली.
पक्षाचा मुख्य नेता म्हणून मारुती मेंगाळ यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा असून त्यांना कोणतीही अडचण आल्यास नक्की दूर करू तसेच  त्यांनी मागणी केल्यानुसार मालुंगे सोंगाळवाडी येथील प्रलंबित कामेही नक्की पूर्ण केली जातील, या वाडीचे नक्की पुनर्वसन केले जाईल. तसेच त्यांनी केलेल्या इतर मागण्यांवर शासनस्तरावर नक्की निर्णय घेऊ असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!