श्रीरामपूर-
माझी विरोधकांना विनंती आहे की खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका. ज्यांनी ती केली त्यांना ती अजिबात परवडली नाही.हवं तर वेळ काढून त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांचा अनुभव व त्यांचे दुःख विचारा,असा खोचक टोला मा.खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज श्रीरामपूरात कुणाचेही नाव न घेता लगावला.परंतू त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे उपस्थितांच्या लक्षात आले.आज अशोकनगर फाटा ते अशोकनगर या ५० लाख रूपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी गिरीधर आसने, दिपक अण्णा पटारे, बाबासाहेब चिडे, नानासाहेब पवार, संजय फंड, जितेंद्र छाजेड, शरद नवले, पोपटराव जाधव, विठ्ठलराव राऊत, गणेश मुदगुले, अक्षय राऊत, शामलिंग शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले, श्रीरामपूर तालुका आणि विखे पाटील कुटूंबाचे वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आणि प्रेम आहे. या विश्वासाला आणि या प्रेमाला कदापि तडा जाऊ देणार नाही.विरोधकांमध्ये धमक असेल तर त्यांनी काय काम केले? ते सांगावे. नुसती चिखलफेक करू नये.आम्ही काय केले नाही, ती टिका फक्त करू नका. चिखलफेक करण्यापेक्षा श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाचा अनुषेश भरून काढण्यासाठी मदत करा. माझ्यावर भविष्यात टिका होणार आहे.मीही त्याला जशाच तसे उत्तर देईल. स्व. बाळासाहेब विखे पाटील, स्व. जयंतराव ससाणे व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकत्रित श्रीरामपूरचा विकास सुरू केला होता. परंतु, त्यानंतर १५ वर्षे हा तालुका विकासाच्या बाबतीत मागे राहीला. खंडकऱ्यांच्या वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ केल्या. जमीन वाटपाचा ऐतिहासिक निर्णय घेतला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी आजच दीड कोटी रूपयांच्या निधीची घोषणा केली. येत्या पुढील सहा महिन्यात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
प्रवरा उजव्या आणि डाव्या दोन्ही कालव्याच्या आणि त्याच्या पोटचाऱ्या यांच्या नूतणीकरणासाठी २५० कोटींचा निधी जलसंधारणमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून हे काम होणार आहे.

आज छोटया गोळ्या पुढे डोस वाढवू
मी डॉक्टर असल्याने एकदम जर डोस वाढवला तर पेशंट कोमात जातो हे मला माहीत आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त बोलत नाही, आज छोटया गोळया दिल्या आहेत, पुढे डोस वाढवू आणि श्रीरामपूर तालुक्यातील पेशंट बरे करू असेही खा. डॉ. सुजय विखे पाटील शेवटी म्हणाले.