श्रीरामपूर –
टिळकनगर इंडस्ट्रीज प्रकरणावरुन आ. हेमंत ओगले यांनी घेतलेल्या भूमिकेचा आपण निषेध करत असून प्रदुषणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. होणारे प्रदुषण कसे कमी करता येईल, शेतकऱ्यांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल, त्यासाठी कारखाना प्रशासनाबरोबर बैठक घेवून दोनही घटकांना न्याय मिळेल याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे आश्वासन राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी दिले.टिळकनगर इंडस्ट्रीज प्रकरणावरुन आ. हेमंत ओगले यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल परिसरात अनेक संघटनांकडून तीव्र आंदोलन सुरु आहे. टिळकनगर इंडस्टीजमुळे अनेक कामगारांचे कुटुंब व्यवस्था अवलंबून असून आधारीत उद्योगांवर अनेक लोकांचे संसार सुरु आहेत. आ. हेमंत ओगले यांनी विधानसभेत कारखाना बंद करण्याची केलेली मागणी ही अतिशय चूकीची असून त्याचा निषेधच आहे. त्यामुळे अनेकांचे प्रपंच धूळीस मिळतील, नागरीकांवर उपासमारीची वेळ येईल टिळकनगर इंडस्ट्रीज ही परिसराची कामधेनू आहे मागील ३०-३५ वर्षांपासून परिसरातील अनेकांना येथे रोजगार उपलब्ध झालेला आहे. अनेक कामगारांची रोजीरोटी कारखान्यामुळे सुरु आहे. कारखाना बंद करण्याची भूमिका घेतल्यास बेरोजगारीची समस्या निर्माण होणार आहे.कारखान्याच्या प्रदुषीत पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हे खरे आहे. त्या विरोधात शेतकरी वेगवेगळ्या स्तरावर आंदोलने करून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. एका बाजूला कारखाना सुरु राहीला पाहिजे, नोकऱ्या व रोजगार टिकला पाहिजे. दुसऱ्या बाजूला प्रदुषणग्रस्थ शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे, होणारे प्रदुषण कसे कमी करता येईल, शेतकर्यांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल, त्यासाठी कारखाना प्रशासनाबरोबर बैठक घेवून दोनही घटकांना न्याय मिळेल, याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे बेग यांनी सांगितले.
आ.हेमंत ओगले यांनी विधानसभेत कारखाना बंद करण्याची केलेली मागणी ही अतिशय चूकीची असून त्याचा निषेधच आहे. त्यामुळे अनेकांचे प्रपंच धूळीस मिळतील, नागरीकांवर उपासमारीची वेळ येईल टिळकनगर इंडस्ट्रीज ही परिसराची कामधेनू आहे मागील ३०-३५ वर्षांपासून परिसरातील अनेकांना येथे रोजगार उपलब्ध झालेला आहे,असे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी म्हटले आहे.