श्रीरामपूर-
रूईछत्तीशी ता.जि.अहिल्यानगर येथे नगर तालूका पोलिसांनी दोन जणांना बनावट नोटा प्रकरणी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून 80 हजार रुपयांच्या 160 बनावट नोटा व 2 हजार 870 रु.च्या ख-या नोटा जप्त केल्या असून त्यांच्या ताब्यातून 3 अँन्ड्रॉईड मोबाईल व महींद्रा कंपनीची थार गाडी असा एकूण 17 लाख 37 हजार 870 रू. किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीं विरूद्ध नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दि.27/07/2025 रोजी नगर तालूका पो स्टे चे स.पोनी. प्रल्हाद गिते यांना गोपनीय माहीती मिळाली कि, रूईछत्तीशी ता.जि.अहिल्यानगर गावात बायपास रोड येथे दोन जण एका महिंद्रा कंपनीची थार गाडीमधून बनावट भारतीय चलनी नोटा त्या खऱ्या आहेत असे भासवून व्यवहार करण्याकरीता येत आहेत. त्यावरून सपोनी. प्रल्हाद गिते यांनी तात्काळ पोहेकाँ खंडेराव संताजी शिंदे, व चासफौ दिनकर बाबुराव घोरपडे यांना कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी रूईछत्तीशी गावात जावून सापळा लावला. तेव्हा त्यांना माहिती मिळाल्याप्रमाणे वाहन येताना दिसले. तेव्हा पोलिसांनी वाहनास थांबण्यास सांगितले.वाहनातील इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी सोमनाथ माणीक शिंदे वय 25 वर्षे रा. तपोवन रोड, ता.जि. अहिल्यानगर, निखील शिवाजी गांगडे वय 27 वर्षे रा. कुंभळी ता. कर्जत जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.पोलिसांनी त्यांची अंगझडती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यानी अंगझडती देण्यास नकार दिला.पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी अंगझडती व वाहनाची झडती पोलिसांना घेऊ दिली असता त्यांच्या ताब्यातुन हुबेहुब भारतीय चलनाच्या 500 रूपयाच्या बनावट 160 नोटा त्यांची किं.80,000/- मिळून आल्या. 2870 रु. च्या ख-या भारतीय चलनाच्या नोटा मिळून आल्या. तसेच त्यांच्याकडून 3 अँन्ड्रॉईड मोबाईल व महींद्रा कंपनीची थार गाडी असा एकूण 17 लाख 37 हजार 870 रू किं चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून त्यांचे विरूद्ध नगर तालुका पो स्टे गुर नं 628/2025 भा.न्या.स कलम 2023 चे कलम 179,180,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोसई भरत बाजीराव धुमाळ हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी केली.
