अशक्य वाटणारे काम पूर्ण करून दाखवले-मा.खा. विखे पाटील;मोरवाडी व गोरक्षवाडी येथे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचा लोकार्पण सोहळा

श्रीरामपूर-डोराळे, कोराळे, वाळकी, गोरक्षवाडी, मोरेवाडी या गावांमध्ये पाणी येईल, असा विचारसुद्धा लोकांनी स्वप्नात केला नव्हता. मात्र सखोल अभ्यास करून लाभक्षेत्रातील शेवटच्या...

श्रीरामपूर-
डोराळे, कोराळे, वाळकी, गोरक्षवाडी, मोरेवाडी या गावांमध्ये पाणी येईल, असा विचारसुद्धा लोकांनी स्वप्नात केला नव्हता. मात्र सखोल अभ्यास करून लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचे कार्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण करता आले.आपले विरोधक, विपरीत विचार करणारे आणि काही हितचिंतक देखील म्हणत होते की या गावांना पाणी मिळणार नाही. मात्र, हे कार्यकर्त्यांच्या आशावादाचा आणि संघर्षाचा विजय आहे. विरोधकांच्या सातत्यपूर्ण टीकेच्या पार्श्वभूमीवर हे यश म्हणजे आपला खरा विजय आहे. अशक्य वाटणारे काम आपण शक्य करून दाखवले,असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी नमूद केले.राहाता तालुक्यातील मोरवाडी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली व संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे लोकार्पण पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमास कैलास नाना तांबे पाटील, मारुती पाटील, डॉ. सोमनाथ गोरे, शेटे साहेब, प्रकाश गोरे, संतोष गोरडे, मच्छू पाटील  निळवंडे प्रकल्पातील लाभार्थी शेतकरी, ग्रामस्थ, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे म्हणाले निळवंडे लाभक्षेत्रातील कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत दिलेले वचन आम्ही केवळ एका वर्षात पूर्णत्वाच्या दिशेने नेले आहे. पाण्याचा शब्द दिला होता, त्यातील ८०% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण करून पाणी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारएक विशेष अनुभव सांगून  डॉ. विखे म्हणाले डोराळे गावातील जलपूजनाच्या कार्यक्रमात दोन ज्येष्ठ नागरिक भेटले. त्यांनी विचारलं, तुम्ही आम्हाला ओळखता का?’ मी नाही म्हणालो. त्यांनी सांगितलं की, ‘गेल्या १८ वर्षांपासून आम्ही नेहमी तुमच्या विरोधात मतदान करत होतो. पण आमच्या गावात पाणी येईल, हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. ते स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. आता मरेपर्यंत तुमच्या सोबत राहू  अस यावेळी त्यांनी सांगितलं आपल्या कामातून मतपरिवर्तन घडताना पाहिलं आहे. ४० वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा विजय आहे, आणि आजचा दिवस त्यांना समर्पित आहेडॉ. विखे पुढे म्हणाले, “काही लोकांनी केवळ बोगद्यात फोटो काढले, हेल्मेट घालून पाण्याखाली हात वर करून केवळ नाटक केलं. मात्र शेवटी खऱ्या अर्थाने पाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच मिळालं असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश कारखाना व लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. काही लोकांना वाटलं की आता आम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाच्यातूनच बाजूला करता येईल. तशी रणनीती आखली गेली, पण इथल्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा ७० हजार मतांनी विधानसभेला निवडून आलो. विरोधकांनी संपूर्ण ताकद लावूनही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर उभे राहिलो आणि विजय मिळवला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!