श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील निर्जनस्थळी काही तरुण व तरुणी हे अश्लील कृत्य करण्याच्या उद्देशाने तसेच अंमली पदार्थांची नशा करण्याच्या उद्देशाने थांबून राहतात. त्यामुळे भविष्यात तेथे गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडू शकतो.म्हणून त्याला आळा घालण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीसांकडून निर्जनस्थळांची झाडाझडती घेवून कारवाई करण्यात येत आहे.आज दिनांक 26/07/2025 रोजी 03/00 वा. सुमारास चिंचेचा मळा वॉर्ड नं.01 श्रीरामपूर येथे काही तरुण तरुणी अश्लील कृत्य करण्याच्या उद्देशाने थांबले असल्याबाबत नागरिकांकडून माहिती प्राप्त झाल्याने श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने नमुद ठिकाणी जावुन पाहणी केली असता तेथे दोन तरुण व तीन तरुणी अश्लील कृत्य करण्याच्या उद्देशाने तेथे थांबल्याचे पोलिसांना दिसून आल्याने पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारुन त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करुन सदर तरुण-तरुणींच्या पालकांशी संपर्क करुन त्यांना बोलावून घेवुन त्यांनाही याबाबतची समज देण्यात आली आहे.तरी श्रीरामपूर शहरातील निर्जनस्थळी पोलीस पथकाडुन वारंवार भेटी देण्यात येत असून विनाकारण निर्जनस्थळी कोणीही थांबलेले मिळुन आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे आवाहन श्रीरामपूर शहर पोलीसांकडुन तरुण-तरुणींना तसेच नागरिकांना करण्यात आले आहे.
