शिर्डीमध्ये होणार शिवपुराण कथा महोत्सव;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी कुबेरेश्वर धाम येथे घेतली प्रदीप मिश्रा महाराजांची भेट

श्रीरामपूर-शिर्डी येथे येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या भव्य दिव्य आशा...

श्रीरामपूर-
शिर्डी येथे येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या भव्य दिव्य आशा अध्यात्मिक कार्यक्रमात  मार्गदर्शन स्वतः परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराज करण्यार असल्याचे मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.डॉ. सुजय विखे पाटील यांनी मध्यप्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम येथे जाऊन महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शिर्डी येथे येण्याचे सादर आमंत्रण दिले असून येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे होणार आहे.शिवकथा महोत्सवाची संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विखे पाटील कुटुंब घेणार असून,या कार्यक्रमामागे एक हृदयस्पर्शी प्रेरणा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी व अहिल्यानगर परिसरातील माता-भगिनींनी सातत्याने विनंती केली होती की, शिवकथेसारखा अध्यात्मिक सोहळा आपल्या भूमीत व्हावा.

मा.खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी कुबेरेश्वर धाम येथे जाऊन परमपूज्य प्रदीपजी मिश्रा
महाराजांची भेट घेऊन त्यांना शिर्डी येथे येण्याचे निमंत्रण दिले.

या भक्तीभावाला प्रतिसाद देत डॉ सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला ५ लाख पेक्षा जास्त भाविक उपस्थित राहणार आहेत.शिवकथा केवळ श्रवणाचा सोहळा नाही, तर आत्मशुद्धी आणि जीवनाला दिशा देणारा प्रकाशस्तंभ आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या पावन महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!