अशोकने उसाला ३५०० रुपये दर द्यावा;शेतकरी संघटना व सभासदांची निवेदनाद्वारे मागणी;अशोकच्या प्रशासनासह जिल्हा बँकेचे संचालक ससाणे यांनाही निवेदन

श्रीरामपूर-अशोक कारखाना ही एक तालुक्यातील अर्थकरणाची मोठी संस्था असून संस्थेचे कारखाना व्यवस्थापनाने गाळप हंगाम २०२५-२६ साठी उसाला ३५०० रु. प्रति टन...

श्रीरामपूर-
अशोक कारखाना ही एक तालुक्यातील अर्थकरणाची मोठी संस्था असून संस्थेचे कारखाना व्यवस्थापनाने गाळप हंगाम २०२५-२६ साठी उसाला ३५०० रु. प्रति टन दर द्यावा.तसेच मागील दोन हंगामाचे प्रतिटन ८०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी संघटना, सभासद, कामगार व व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात आली.निवेदनाची प्रत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचेसह अशोकचे कार्यकारी संचालक संतोष देवकर यांना देण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की मागील दोन गाळप हंगामात इतर कारखान्यांसह गणेशच्या तुलनेत ८०० प्रति मे .टनाने दर कमी दिलेला आहे. वास्तविक आपणाकडून सातत्याने गणेश कारखान्याची बदनामी करून व सभासदांमध्ये भीती घालून ऊस उत्पादकांची गेल्या ३०-३५ वर्षापासून दिशाभूल केली गेली आहे. मागील दोनही गाळप हंगामामध्ये गणेश कारखान्याने ३००० प्रति टनानी ऊस उत्पादकांचे पैसे कुठल्याही वित्तीय संस्थेची अर्थात जिल्हा बँकेची सक्तीची कपात न करता दिले आहेत. सदर कारखान्याचा एकही संचालक जिल्हा बँकेच्या व्यवस्थापन समितीवर नसून आपण जिल्हा बँकेच्या संचालक मंडळपदी असूनही ऊस उत्पादकांची सक्तीने कपात केली आहे. आपण ऊस उत्पादकांच्या सक्तीने कपाती करून ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडवले आहे.

अशोकचे कार्यकारी संचालक संतोष देवकर यांना शेतकरी संघटनाव सभासदांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

आपण प्रत्त्येक सर्वसाधारण सभेत व प्रत्त्येक निवडणुकीत गणेश कारखाना सत्तांतरामुळे आजारी असल्याचे सातत्याने सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. वास्तविक गणेश कारखाना साखर निर्मिती करून मागील दोनही हंगामात ३००० रुपये प्रति टन दर देऊ शकतो. परंतु आपण सातत्याने गणेश पेक्षा ३०० रुपये साखर निर्मितीमध्ये कमी दिले. साहजिकच उपपदार्थ निर्मिती मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून किमान पाचशे रुपये प्रति टन गृहीत धरल्यास  गणेश पेक्षा ८००/-रुपये प्रति टन जास्त देणे व्यवहार्य होते. परंतु आपणाकडून २७०० रुपये प्रति टन दर देऊन व जिल्हा बँकेची सक्तीची वसुली करून ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे.कारखाना कर्मचाऱ्यांचे ही पगार सात-सात महिने उशिराने होत आहे.या सर्व चुकीच्या बाबींमुळे ऊस उत्पादक सभासद व कामगारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये अशोकच्या शेजारील राहुरी, गणेशसह वैजापूर तालुक्यातील पंचगंगा हा खाजगी नव्याने कारखाना सुरू होत आहे. पंचगंगा शुगर अशोकच्या कार्यक्षेत्रात ३०५० रुपये प्रति टनाने नोंदी घेत आहे.त्यामुळे सुरू होणाऱ्या हंगामासाठी ३५००/-रुपये प्रति टन दर बॉयलर पेटविण्यापूर्वी सर्वसाधारण सभेत घोषित करणे कारखान्याच्या हितरक्षणासाठी गरजेचे आहे.निवेदनाचा उद्देश  कुठलीही राजकीय भूमिका नसून अशोक कारखाना ही तालुक्याची कामधेनू असून ती वाचली पाहिजे हाच आहे,असे शेवटी म्हटले आहे.
शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, डॉ. दादासाहेब आदिक , डॉ. विकास नवले, सुजित बोडके, शिवाजी पटारे , संजय काळे, बबनराव उघडे, इंद्रभान चोरमळ, संदीप अभंग, भागचंद औताडे, कडू पवार, अकबर शेख आदिंसह ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी संघटना, सभासद, कामगार व व्यापारी बांधवांच्या वतीने निवेदनाची प्रत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनाही देण्यात आली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!