हल्लेखोरांविरोधात तातडीने कठोर कारवाई करा-राष्ट्रवादी सरचिटणीस आदिक;उक्कलगाव येथे इंद्रनाथ थोरात यांच्या घरी भेट

श्रीरामपूर –श्रीरामपूर माजी पंचायत समिती सभापती इंद्रनाथ थोरात यांच्यावर अलीकडेच झालेल्या हल्ल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. या अमानुष प्रकारावर राष्ट्रवादी...

श्रीरामपूर –
श्रीरामपूर माजी पंचायत समिती सभापती  इंद्रनाथ थोरात यांच्यावर अलीकडेच झालेल्या हल्ल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. या अमानुष प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी तीव्र संताप व्यक्त करत हल्लेखोरांविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उक्कलगाव येथे ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांच्या घरी भेट दिली.त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी अविनाश आदिक बोलत होते. यावेळी पंडितराव थोरात,रवींद्र थोरात ,सुनील थोरात,शहाराम शेटे , भागवतराव मुठे,रावसाहेब आदिक, काळे,प्रशांत खंडागळे आदी उपस्थित होते.आदिक पुढे म्हणाले की,इंद्रनाथ थोरात यांच्यावर रस्त्यात अडवून हल्ला करण्यात आला. हे केवळ एका नेत्यावरचे नव्हे तर संपूर्ण सामाजिक सभ्यतेवरचे आक्रमण आहे. अशा घटनांमुळे श्रीरामपूरसारख्या प्रगल्भ व पुरोगामी तालुक्याचे सामाजिक आरोग्य धोक्यात येते आहे.गेल्या काही काळात समाजात अराजकता आणि धक्कादायक घटना घडत आहेत. सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत.सामाजिक स्वास्थ टिकवण्यासाठी पोलिसांनी केवळ घटनांची नोंद न करता, अशा घटना घडूच नयेत यासाठी प्रिव्हेन्शन मोडमध्ये काम केले पाहिजे. या हल्ल्यामागची पार्श्वभूमी, कटकारस्थान, आणि संभाव्य राजकीय दुजाभाव याचा सखोल तपास करणे गरजेचे आहे.अशा प्रवृत्तींना मोकाट सोडल्यास उद्या आणखी गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागतील,” असा इशाराही त्यांनी देऊन हल्ल्याचा तपास जलदगतीने करावा, दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आदिक यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांच्या घरी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!