नाल्याच्या भूमिगतकरणासह विविध मागण्या मान्य; नगरसेविका स्नेहल खोरे यांच्या प्रयत्नांना यश;पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

श्रीरामपूर–
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांतील महत्त्वपूर्ण विकासकामांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रभागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या मांडण्यात आल्या असून, नगरसेविका सौ. स्नेहल केतन खोरे व मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिलेल्या निवेदनावर ना.विखेंनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी सभापती दिपक पटारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, जि.प.सदस्य शरद नवले, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, रवी पाटील, वैशाली चव्हाण, अभिषेक खंडागळे, संजय गांगड, मनोज लबडे, राजू आदिक, सोमनाथ गांगड आदी उपस्थित होते.
शहरातील सांडपाण्याचा उत्सव मंगल कार्यालय ते महाले पोदार स्कूल दरम्यानचा नाला (चर) हा परिसरातील प्रमुख समस्या आहे. या नाल्याचे सिमेंट काँक्रेटीकरण करून भूमिगत करण्याची मागणी नगरसेविका सौ. स्नेहल खोरे यांनी केली. पालकमंत्री विखे पाटील यांनी तात्काळ या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक किरण सावंत व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना प्रस्ताव सादर करून त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
यासोबत नगरसेविका स्नेहल खोरे यांनी भोंगळ वस्तीतील पाणीपुरवठा पाईपलाईन जोडण्याची, पूर्णवादनगर टीपी रिझर्व्हेशन काढण्याची आणि प्रभागासाठी वाढीव निधी मंजूर करण्याची विनंती केली. या सर्व मुद्द्यांवर पालकमंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना यावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.  पूर्णवादनगरमधील टीपी रिझर्व्हेशनचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यात अडचणीमुळे स्थानिकांना घरकुल अनुदान मिळण्यास अडथळे येत आहेत. खोरेंच्या प्रयत्नाने येथील डीपी रिझर्व्हेशन रद्द झाले आहे. प्रभागाच्या विकासासाठी केतन खोरे व स्नेहल खोरे या सातत्याने कार्यरत असून त्यांच्यामुळे शहर विकासात हा प्रभाग प्रथमस्थानी आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी विजय पाटील, सुदर्शन शितोळे, विजयकुमार शर्मा, मनोज होंड, मनोज नागरे, विवेक भोईर, अनिल उनवणे, प्रमोद कु-हे, मोघले साहेब, बी.एम.पवार, पंकज बनकर, विशाल रुपनर, तुषार चांडवले, महिला शहराध्यक्ष पुष्पलता हरदास, पूजा चव्हाण, सीमा पटारे, अलका राऊत, वर्षा भोईर, अनिल पंडित, राहुल सागडे, सीमा पाठक, लता जगताप, मंगल शितोळे, शुभांगी सातपुते, रेखा होते, नूतन माळवे, अग्रवाल भाभी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांतील विकासकामांचे लोकार्पण ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News