योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न; तहसीलदार अमोल मोरे;दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिर

श्रीरामपूर-  
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर यांच्या माध्यमातून विविध योजना या अस्थिव्यंग व्यक्तीसाठी सुरू आहेत. अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम होत आहे या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे यांनी केले.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम  कानपूर,एस.आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, एडीप योजनांतर्गत आयोजित राहाता येथे आयोजित शिबीरात मोरे बोलत होते. यावेळी
गटविकास अधिकारी विवेक गुंड , तालुका आरोग्य विभाग  डाॅ.संजय घोलप, ऍड.रघुनाथ बोठे, माजी  नगराध्यक्ष सोपान  सदाफळ कैलास सदाफळ,श्री साई श्रद्धा ग्रामीण मूक बधिर विद्यालयांचे बाळासाहेब कासार, डाॅ.यशस चुंबळे,संजय सदाफळ,भाऊसाहेब जेजुरकर, साहेबराव निथाने, जबाजी मेचे, विजय सदाफळ, सागर सदाफळ, विजय शिंदे, अंबादास गाडेकर, चंद्रभान मेहत्रे, उत्तमराव डांगे, राजेंद्र वाबळे आदीसह लाभर्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोरे म्हणाले की मंत्री विखे पाटील आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे ही योजना तळागाळापर्यंत पोहोचत आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळत असून त्यांना नोंदणी तपासणी आणि लगेचच साहित्य मिळत असल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय आता दूर होत आहे या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.अॅड. रघुनाथ बोठे म्हणाले  शिर्डी मतदार संघात आणि जिल्ह्यांमध्ये जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम हे लोकाभिमुख ठरत आहेत. विविध   योजनेचा प्रचार प्रसार करत असतानाच योग्य लाभार्थ्यांपर्यंत ही योजना कशी पोहोचेल आणि या योजनेतून त्या लाभार्थ्याला दिलासा कसा मिळेल यासाठी मंत्री विखे पाटील हे कायमच प्रयत्नशील राहिले आहेत.  आज जिरायत भागामध्ये पाणी पोहोचले आहेत निळवंडे गोदावरी कालव्यांचा प्रश्न ही आता मार्गी लागला आहे.  
प्रारंभी कासार यांनी  योजनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी राहाता तालुक्यातील विविध गावातील  लाभार्थी उपस्थित होते.जनसेवा फाउंडेशन सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून मंत्र विखे पाटील आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग संचलित
मंगळवार दि.१५ जुलै रोजी साई विठ्ठला लॉन्स, चितळी रोड, राहाता येथे तर सोमवार दि.२१ जुलै  रोजी  श्री साई निर्माण इंग्लिश मिडीयम स्कूल, विमानतळ रोड, श्री कृष्ण नगर शिर्डी येथे करण्यात आल्याची माहीती डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजित दिवटे यांनी दिली.

अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिरातून कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप आणि तात्काळ मोफत जागेवर साहित्य वाटप झाल्याने या शिबिरामुळे  दिव्यांग व्यक्तींच्या चेह-यावर नवचैतन्य  आले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News