कोपरगावजवळ गुटख्याचा टेम्पो पकडला;७७ लाखांचा मुद्देमाल जप्त;एका जणास अटक;पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकाची कारवाई

श्रीरामपूर-अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखूची वाहतूक...

श्रीरामपूर-
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे. या प्रकरणी एका जणास अटक करण्यात आली असून पोलिसांच्या पथकाने सुमारे ७६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे दि.०८/०७/२०२५ रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलींग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, समृध्दी महामार्गावरील कोपरगावकडे जाणाऱ्या टोलनाक्याजवळ एक आयशर कंपनीचा टेम्पो त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला क्र. MH-४६-BB-८०९८ या वाहनामध्ये काही जण हे राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला खाद्यपदार्थ पान मसाला, गुटखा वाहतूक केली जाणार आहेत. त्यानुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी पोलीस पथकासह रवाना झाले.वरील नमुद ठिकाणी जाऊन पथकातील अधिकारी व अंमलदार सापळा लाऊन थांबले असताना, थोड्याच वेळात समृध्दी महामार्गावरील कोपरगावकडे जाणाऱ्या टोलनाक्याजवळ एक आयशर कंपनीचा राखाडी रंगाचा टेम्पो त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला येताना दिसला. तो जवळ येताच पोलीस पथकाने इशारा करुन सदर टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबून बातमीतील नमूद माहिती प्रमाणे सदरची गाडी आयशर कंपनीचा टेम्पो क्र. MH-४६-BB-८०९८ ही असल्याची खात्री झाल्याने पंचासमक्ष सदर गाडीवरील चालकास ताब्यात घेऊन पोलीस पथक असल्याची माहिती देऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अकील रमजान शेख वय ४२ वर्षे रा. भगतसिंग नगर ता.जि. आदिलाबाद ता.जि. आदिलाबाद राज्य-तेलंगणा हल्ली रा. कोदरी ता.मागांव जि. यवतमाळ असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष सदर गाडीची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये सुगंधीत तंवाखू व पानमसाला भरलेल्या गोण्या मिळून आल्या. पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचांसमक्ष अन्न व प्रशासन अधिकारी यांच्या समवेत वरील आरोपी व आयशर टेम्पो मध्ये मिळून आलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आणून मुद्देमालाची तपासणी केली असता त्यात बाजीराव रॉयल ब्लेंडेड फ्लेवर पानमसाला २२,९५० पैकेट (७५ गोण्या),मस्तानी २१६ प्रीमियम च्युइंग सुगंधीत तंबाखू २४,७५० पैकेट (७५ गोण्या),आयशर टेम्पो क्र-MH-४६-BB-८०९८ असा एकूण ७६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमालाबाबत आयशर टेम्पो कंपनीचा चालक अकील रमजान शेख  यास  विचारपूस केली असता त्याने सदरचा माल हा मामू रोडलाईन ट्रॉन्सपोर्ट याचे व्यवस्थापक (पूर्ण नाव माहित नाही) याचे मार्फत घेवून जात असलेबाबतचे सांगितले.सदर मुद्देमाल पंचनामा करुन जप्त केला आहे.कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला  प्रतिबंधीत अन्न पदार्थाची विक्री साठा करून महाराष्ट्र शासन यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारा आरोपी व मामू रोडलाईन ट्रॉन्सपोर्ट याचे व्यवस्थापक (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा अधिकारी राजेश नामदेव बडे यांच्या फिर्यादी वरून गु.र.नं. ३६२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००३ व त्याखालील व नियमने २०१९ चे कलम २६ (२) (iv), २७ (३) (d)(e) रु कलम ३०(२) (३), ३(१) (२४), ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक
सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें,  
उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोसई राजेंद्र वाघ, पोहेकों शंकर चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडण्यात आला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!