श्रीरामपूरच्या नगराध्यक्षांचा बिलांवरील सहीचा अधिकार रद्द;जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश निर्गमित

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपालिकेच्या देयकांवरील (बील) नगराध्यक्षाची सही घेण्याचा अधिकार रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांनी जारी केले आहेत. नगरपरिषद प्रशासन...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिकेच्या देयकांवरील (बील) नगराध्यक्षाची सही घेण्याचा अधिकार रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांनी जारी केले आहेत. नगरपरिषद प्रशासन शाखेकडून मुख्याधिकारी,श्रीरामपूर नगरपरिषद यांना यासंदर्भात अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे.दरम्यान जिल्हाधिकारी यांचा हा आदेश नगराध्यक्ष करण ससाणे यांना धक्का मानला जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्र नगरपरिषद,नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ५८(२)(ब) तसेच सुधारित तरतुदीनुसार नगराध्यक्षांचे वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रण समाप्त करण्यात आले आहे.त्यामुळे नगरपालिकेच्या देयक प्रमाणक व धनादेशांवर नगराध्यक्षांची स्वाक्षरी घेणे हे सुधारित कायद्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या संदर्भात जयदीपराज इन्फ्रा प्रा.लि.मुंबई यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर नगरपरिषद प्रशासन शाखेने कायद्यातील सुधारित तरतुदींचा संदर्भ देत हा आदेश निर्गमित केला आहे.
तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार अधिसूचनेनुसार नगराध्यक्षांचे वित्तीय व कार्यकारी अधिकार रद्द करण्यात आले असून मुख्याधिकाऱ्यांनी अध्यक्षांच्या नियंत्रण, निर्देश व पर्यवेक्षणाखाली कामकाज करण्याची पूर्वीची तरतूदही वगळण्यात आली असल्याचे आदेशात नमूद आहे.
या सुधारित तरतुदींमुळे नगराध्यक्षांचे नगरपरिषद व मुख्याधिकाऱ्यांवरील वित्तीय व कार्यकारी नियंत्रण संपुष्टात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असून संबंधित सर्व नगरपरिषदांनी शासनाच्या नव्या नियमांचे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.
            

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!