श्रीरामपूर-
राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भ लिंगनिदान प्रकरणी लोणी पोलीस स्टेशन येथे दाखल असणाऱ्या गुन्ह्यात यापूर्वी एकूण 12 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण दोन डॉक्टर,चार एजंट व सहा संबंधित गर्भवती महिलांचे कुटुंबीय असे एकूण 12 आरोपी अटक करण्यात आले आहेत.गुन्ह्याचा तपास करत असताना असे निष्पन्न झाले की, बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठी लागणाऱ्या गोळ्या या श्रीरामपूर येथील डॉ. राज अजीज शेख हे पुरवत होते. त्यानुसार आज पहाटे डॉ. राज शेख, वार्ड नंबर 2 यांना अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील कार्यालयातील पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार सदरच्या गुन्ह्यामध्ये डॉ. राज अजिज शेख राहणार वार्ड नंबर दोन श्रीरामपूर यास आज पहाटे अटक करण्यात आली आहे.अटक करून त्यांना आज रोजी पोलीस कस्टडी मिळणे कमी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.आजखेरपर्यंत या गुन्ह्यात एकूण 13 आरोपी अटक आहेत. गुन्ह्याचा बारकाईने तपास सुरु आहे. गर्भलिंग निदान केलेल्या महिलांची माहिती घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे.तसेच गर्भलिंग निदाणासाठी बेकायदेशीर पणे मशीन कोठून खरेदी केले, त्यासाठी एजंट कोण त्याचीही माहिती प्राप्त झाली असून त्यांनाही ताब्यात घेणेकामी पथक रवाना केले असल्याचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले आहे.
