श्रीरामपूर-
रासायनिक खतांची बेकायदेशीर साठेबाजी करणाऱ्या खत विक्रेत्यांविरुद्ध कृषी विभागाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील मे. शिवशंभो कृषी सेवा केंद्रात युरियाचा साठा असूनही देखील तो दडवून ठेवल्याप्रकरणी केंद्रचालक अमोल आबासाहेब तनपुरे याच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी अचानक (दि.१२) मे रोजी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने टाकळीभान येथील संबंधित केंद्राची तपासणी केली. यावेळी दुकानाची व
गोदामाची अचानक केंद्रात युरिया खताचा मोठा साठा उपलब्ध असल्याचे दिसून आले. मात्र, तपासणी दरम्यान अनेक गंभीर बाबी समोर आल्या असून शासकीय पीओएस मशीननुसार केंद्रात १५.७७ टन युरिया शिल्लक असणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्ष साठा आणि नोंदवही यात कमालीची तफावत आढळून आल्याचे दिसून आले. १ एप्रिल २०२५ पासून १९.१२५ टन युरिया विक्री झाल्याचे मशीनवर दिसत होते. मात्र, विक्रीची नोंद होती. उर्वरित ८.९२ अवैध टन युरियाचा कोणताही हिशोब
किंवा अधिकृत बिले केंद्रचालकाकडे आढळली आली नाहीत. केंद्रचालकाने कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) अभय थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, खत नियंत्रण आदेश १९८५ मधील खंड ४ व ५, तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम ३ व ७नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात खत दडवून ठेवणाऱ्या इतर विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. याचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे करीत आहे.दरम्यान बोगस खत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत स्वतः मालामाल होत असलेल्या परिसरातील कृषी केंद्र चालकांवरही कृषी विभागाने करडी नजर ठेवावी अशी मागणी होत आहे.
