श्रीरामपूर मधील महानुभाव पंथांच्या देवस्थानांचा होणार विकास;९ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर-आ.ओगले

श्रीरामपूर- प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२५-२६ अंतर्गत पर्यटन संचालनाच्या माध्यमातून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महानुभाव पंथांच्या विविध देवस्थानाचा विकास करण्याकरिता सुमारे...

श्रीरामपूर-

प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२५-२६ अंतर्गत पर्यटन संचालनाच्या माध्यमातून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महानुभाव पंथांच्या विविध देवस्थानाचा विकास करण्याकरिता सुमारे ९ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाली असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली आहे.श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महानुभव पंथांचे महत्त्वाचे देवस्थान असून याकरिता भाविकांच्या सोयी सुविधा करिता शासनाकडे निधीची मागणी केली होती त्या अनुषंगाने पर्यटन विभागाच्या माध्यमातून कमालपूर येथे चक्रधरस्वामी मंदिर परिसरात भक्तनिवासाचे बांधकाम पत्र्याचे शेड व परिसर सुशोभीकरण करणे -२ कोटी, बेलापूर येथील चक्रधर स्वामी मंदिर परिसरात भक्तनिवास बांधून सुशोभीकरण करणे – २ कोटी,नाऊर येथील श्री.महानुभव दत्त मंदिर परिसरात भक्तनिवास बांधून अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे २ कोटी,भोकर येथील गुंफेकर बाबा महानुभाव आश्रम परिसरात भक्तनिवास बांधणे व रस्ते कॉंक्रिटीकरण करणे १ कोटी, बेलापूर रोडवरील श्री चक्रधर महानुभाव आश्रम येथे सुविधा निर्माण करणे असे एकूण ९ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.सदरच्या कामाच्या लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन विकास कामांना सुरुवात होणार आहे त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघातील विकास कामासाठी आपण कटिबद्ध असून मतदारसंघातील अनेक महत्त्वांच्या रस्त्यांच्या कामाला देखील निधीची मागणी केली असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!