हिंदुत्ववादी दलाल अन क्रॉस व्होटींगमुळे भाजपाचा पराभव-पालकमंत्री विखे पाटील;भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

श्रीरामपूर-हिंदुत्वाच्या नावाखाली ज्यांनी श्रीरामपुरात आयुष्यभर दलाल्या केल्या त्यांच्यामुळे आणि क्रॉस व्होटिंगमुळे श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी हा पराभव...

श्रीरामपूर-
हिंदुत्वाच्या नावाखाली ज्यांनी श्रीरामपुरात आयुष्यभर दलाल्या केल्या त्यांच्यामुळे आणि क्रॉस व्होटिंगमुळे श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी हा पराभव तांत्रिक असून भारतीय जनता पक्षाने निवडणु‌कीत जे श्रीरामपूरच्या विकासाचे आश्वासनं दिले ते पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू,असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात  पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे मार्गदर्शन करताना बोलत होते.येथील उत्सव मंगल कार्यालयात नगरपालिकेत निवडून आलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि पराभूत उमेदवारांचा सत्कार समारंभ विखे पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की,एका देशद्रोही माणसाच्या अंत्यविधीला श्रीरामपुरात एवढे लोक येतात आणि असे सांगितले जाते की तो या बॉम्बस्फोटात नव्हता, तो त्या बॉम्ब स्फोटात होता.बॉम्बस्फोटातील आरोपीचे समर्थन करणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे.हिंदुत्वाच्या नावाखाली दलाली करणारेही या विषयावर शब्दभर बोलायला तयार नाही. त्यांची अजून साधी प्रतिक्रिया देखील यावर नाही. या महाराजांचं नाव घ्यायचं,त्या महाराजांचं नाव घ्यायचं.महाराज लोकांना खोटेनाटे सांगून या दलालांनी आजवर दलाल्या केल्या.त्यांची वस्तुस्थिती त्या महाराजांपुढे मांडून तुम्हाला यांनी कसे फसवले हे सांगण्याची गरज आहे.आपल्यामध्ये काहींनी वर्षानुवर्षे मांडवलीचा धंदा स्विकारलेला आहे आणि या मांडवलीच्या या धंद्यामु‌ळे हा पराभव स्विकारवा लागला आहे. अनेक ठिकाणी १०-१०, २०-२० मतांनी उमेदवार पराभूत झाले त्या ठिकाणी या दलाली करणाऱ्या लोकांना ४००-५०० मतं पडली,त्यामुळे हा पराभव झाला. हा तांत्रिक पराभव आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला १८ हजार मतं पडली, काही वॉर्डामध्ये आपल्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराला जादा मतदान आहे तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी कमी मतं आहे. क्रॉस व्होटींगचाही फटका पक्षाला बसला आहे. ते का झालं? याची कारणमिमांसा करत बसण्यापेक्षा पराभव झाला, तो सोडून देत पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागणे गरजेचे आहे.देशात, राज्यात भाजपाचं खंबीर नेतृत्व असल्याने येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत शतप्रतिशत भाजपाला निवडून आणायचे आहे,असे ना. विखे पा.यांनी स्पष्ट केले.शहरातील वॉर्ड नं.२ मध्ये जावून  एका विशिष्ट भागात  विरोधकांना १५ जागा मिळतात. भाजप सरकारच्या योजना तुम्हाला चालतात मात्र मतदानावेळी या पक्षाचे तुम्हाला एवढे वावडे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.आपल्या नगरसेवकांचा यंत्रणेवर दबावर राहीला पाहीजे. समोरचे लोक जे निवडून आले ते एका विशिष्ट भागातूनच निवडून आले. मी कर्मवीर चौकात एकाच पोस्टर पाहीलं, मी मुख्याधिकाऱ्यांना आणि पोलिसांना विचारणार आहे की हे देशभक्ताचं पोस्टर आहे की कोणाचं आहे? एक देशद्रोही माणूस आहे, त्याच्यावर १८ गुन्हे दाखल आहे. केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम जामीनावर तो सुटलेला होता. तो बॉम्ब स्फोटातील आरोपी आहे. अशा माणसाचे पोस्टर लागतात यापेक्षा आणखी काय दुर्दैव पाहीजे. तुम्ही नागरीकांनी स्वतःहुन ते काढून टाकायला पाहीजे होते. पण आपल्यामध्ये धमक कुठे राहीली? हा याला घाबरतो, तो त्याला घाबरतो असत असंच आपण बोटचेपेपणाचं धोरण स्विकारलं तर आपल्याला लोकं रस्त्यावर फिरून देणार नाही,असेही पालकमंत्री विखे पाटील शेवटी म्हणाले.यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. नगराध्यक्ष संजय फंड, मा.सभापती दिपक पटारे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, नानासाहेब पवार, गिरीधर आसने, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, संजय गांगड, संजय छल्लारे, आशिष धनवटे, सौ. वैशाली चव्हाण, दिपक चव्हाण, सौ. स्नेहल खोरे,भाऊसाहेब बांदरे,शंकर मुठे,आशाताई रासकर यांच्यासह भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!