आठ दिवसात विस्थापित व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढू-पालकमंत्री विखे पाटील यांचे आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच शहरातील अतिक्रमण कारवाईत विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेवून येत्या आठ दिवस दिवसांत विस्थापितांच्या पुनर्वसनाचा...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच शहरातील अतिक्रमण कारवाईत विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेवून येत्या आठ दिवस दिवसांत विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकालीकाढू असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारत येथे शासकीय आढावा बैठकीला आले होते. त्यावेळी त्यांना श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली  विस्थापित दुकानदारांचे पुनर्वसन करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,श्रीरामपूर शहरात एसटी महामंडळाची फार मोठी जागा उपलब्ध आहे. त्या जागेमध्ये गाळे बांधून विस्थापित व्यापाऱ्यांना ते गाळे देण्याचा आपला विचार आहे.
याप्रसंगी सुभाष त्रिभुवन म्हणाले की श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड, बेलापूर रोड, गोंधवणी रोड, नेहरू मार्केट समोरील विविध व्यवसाय करून आपली उपजीविका भागवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानावर श्रीरामपूर नगरपरिषदेने बुलडोझर फिरवून त्यांना बेरोजगार केले.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. एसटी महामंडळाच्या जागेत गाळे बांधून पुनर्वसन करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.तोपर्यंत विस्थापित व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे त्या जागेवर पाच फुटांची जागा देऊन त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात यावे. विस्थापित व्यापारी त्यासाठी नगरपरिषदेबरोबर एखादा  करारनामाही करून देण्यास तयार आहेत. त्यावर पालकमंत्री विखे पाटील यांनी त्यास सहमती दर्शवली असल्याचेही त्रिभुवन यांनी सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!