श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या विविध विशेष समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. प्रांताधिकारी किरण सावंत यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात ही प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली.
नियोजन समितीच्या सभापतीपदी सौ. कांचन दिलीप सानप यांची निवड झाली. बांधकाम समितीच्या सभापतीपदी रईस जहागिरदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. मंजुश्री सिद्धार्थ मुरकुटे तर उपसभापतीपदी श्री. नागेश्वरी रितेश एडके यांची निवड झाली.
पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी श्री. योगेश जाधव, आरोग्य समितीच्या सभापतीपदी श्री. दीपक वमने, तर शिक्षण समितीच्या सभापतीपदी श्री. राजेंद्र पवार यांची निवड करण्यात आली.
याशिवाय स्थायी समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून श्री. दिलीप नागरे, श्री. मुजफ्फर शेख आणि श्री. आशिष धनवटे यांची निवड करण्यात आली.
या निवडीप्रसंगी मध्यप्रदेशचे माजी मंत्री आमदार राजवर्धन दिग्विजय सिंग, आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
