पाटचाऱ्या नादुरूस्तीमुळे शेतकऱ्यांचे भरणे टांगले;प्रजासत्ताक दिनी छावाचा आंदोलनाचा इशारा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाचे रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन सुरू असून पाटबंधारे विभागाने रब्बी आवर्तन सुरू होण्यापूर्वी सर्व पाटचाऱ्या दुरूस्त करणे गरजेचे होते. परंतू...

श्रीरामपूर-
भंडारदरा धरणाचे रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन सुरू असून पाटबंधारे विभागाने रब्बी आवर्तन सुरू होण्यापूर्वी सर्व पाटचाऱ्या दुरूस्त करणे गरजेचे होते. परंतू पाटबंधारे विभागाने ते न केल्याने अनेक शेतकऱ्यांचे भरणे टांगले आहेत. या पाटचाऱ्यांची लवकरात लवकर दुरूस्ती करून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी पाटबंधारे कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिला आहे.
याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावर्षी अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी शेतातील गाळ,माती, दगडधोंडे पाण्यातून वाहत येऊन चारीमध्ये छोटेमोठे भराव तयार झाले आहेत. तसेच अतिपावसाने चारीत गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे.पाटचारीकडे पाटपाणी व्यतिरिक्त इतरवेळी संबंधित विभागाचे लक्ष राहत नाही.पाटात पाणी दिसले की मग  जेसीबीचा शोध घेऊन कुठेतरी चारी दुरूस्त करण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातो.त्यातून प्रत्येक लाभधारक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहचत नाही. अशीच परिस्थिती सध्या चालू रब्बी हंगामात पहावयास मिळत आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी सुटलेले आवर्तन बेलपिंपळगाव, कारेगाव, वडाळा या विभागात पोहचले. परंतू त्या ठिकाणी चाऱ्या नादुरूस्त असल्याने अनेक लाभधारक शेतकऱ्यांपर्यंत पाणी गेले नाही.शेतकरी सिंचन शाखेमध्ये चकरा मारतात. ७ नं. अर्ज भरण्यासाठी जातात. तेव्हा त्या सिंचन शाखेमध्ये कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतो. तसेच पाणी अवर्तन चालू असताना देखील उपअभियंता, पाटकरी कर्मचारी असे कोणीही अधिकारी सिंचन शाखेत भेटत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना  अडचणी येतात. शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्जाची पोहोच दिली जात नाही.त्याचप्रमाणे पाणीपट्टी भरल्यानंतर पोहोच पावती देण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. यासह इतर अनेक प्रश्नांसाठी जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर आपण कारवाई करून चालू रब्बी आवर्तनामध्ये पाणी मागणी अर्ज दिलेल्या शेतकऱ्यांचे भरणे राहिल्यास त्यांना  नुकसान भरपाई देणार आहात का? याचा खुलासा करण्याची मागणी  करण्यात आली आहे.तसे ना झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी  कार्यालयासामोर अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!