श्रीरामपूर-
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून श्रीरामपूर – राहूरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र अप्पर सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विशेष करून शेती विषयाबाबत महाराष्ट्रात नव्हे तर देशात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कृषी विद्यापीठावर आमदार ओगले यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर शेतकरी, शेतमजूर यांसारख्या तळागळातील घटकांसाठी विधानसभेमध्ये आवाज उठवला व मतदार संघातील अनेक महत्त्वपूर्ण विषय मुद्देसूतपणे मांडले. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नामदार राहुल नार्वेकर यांच्याकडून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड केली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाची मोठी परंपरा असून यापूर्वी देखील अनेक मान्यवरांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे. शेती, पशुसंवर्धन यामध्ये आधुनिक बदल घडवून त्याचा शेतकरी वर्गाला कसा फायदा होईल यासाठी कृषी विद्यापीठ हे नवनवीन प्रयोगासाठी प्रयत्नशील असते. आमदार ओगले यांच्या निवडी मुळे निश्चितच मतदारसंघाला फायदा होणार आहे.आमदार ओगले यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, गटनेते मुजफ्फर शेख, यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
