ॲड.समीन बागवान यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला पुन्हा धक्का;पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

श्रीरामपूर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष,माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांचे सहकारी ॲड. समिन बागवान यांनी काल दि.27 रोजी पालकमंत्री...

श्रीरामपूर-
जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष,माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांचे सहकारी ॲड. समिन बागवान यांनी काल दि.27 रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश केला.गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेस पक्षात् सक्रिय, एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत होते.
2019 व 2024 च्या विधानसभा निवड नुकित सक्रिय सहभागी,जाहीर सभामधून उत्कृष्ट मुद्देसूद मांडनी करुन काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.नगरपालिका निवडणुकीत पक्षश्रेष्टी कडून दखल न घेता अन्याय झाल्याने नाराज होते.पालकमंत्री विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी भारतीय जनता पक्षाची दीनदलित,मुस्लिमअल्पसंख्याक, शेतकरी यांच्या बाबतीत असणारी सर्वसमावेशक भूमिका पसंत पडल्याने व भविष्यात अल्पसंख्याक समाजाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी एक उत्तम समन्वयकाची भूमिका घेऊन वाटचाल करण्यासाठी तसेच आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा कायदेशीर, सामाजिक,राजकीय व वैद्यकीय सेवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळवुन देण्याचा मानस ठेऊन जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ॲड. बागवान यांच्या प्रवेशाबद्द्ल आंनद व्यक्त करुन त्यांना निश्चित न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.


याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितिन दिनकर, दिपक पटारे, इंद्रनाथ पाटील थोरात,संजय फंड, श्रीनिवास बिहानी,रवि पाटील,केतन खोरे,आशिष धनवटे,नारायण डावखर, मुख़्तार शाह,नजीर मुलानी,महेबुब कुरैशी,हाजी इस्माइल,मोहसिन शेख,मेहबूब प्यारे,मुदस्सर शेख,तौफीक शेख,शरद नवले,अभिषेक खंडागळे,नाना शिंदे,नीतिन भागडे,दिपक चव्हाण,विराज भोसले,बंडु शिंदे,राहुल आठवाल आदि उपस्थित होते. याप्रसंगी समिन बागवान यांचे समवेत अनेक सहकाऱ्यानी जाहीर प्रवेश केला.सदर प्रवेश हा कॉंग्रेस पक्षासाठी धक्का समजला जात असून बागवान हे एक उत्कृष्ट वक्ते असून उत्तम संघटन कौशल्य व सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर पक्षा सोबत जोडला जाईल यात शंका नाही, असे याप्रसंगी अनेक उपस्थितांनी बोलून दाखवले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ॲड.समीन बागवान यांनी भाजपत प्रवेश केला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक हेही उपस्थित होते.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!