काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर गुन्हा दाखल;छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान भोवला

श्रीरामपूर-छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवामान केला म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत आज...

श्रीरामपूर-
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवामान केला म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आज ऋषिकेश सरोदे या तरुणाने फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुजर यांच्या विरोधात
भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये कलम 353 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ऋषिकेश सरोदे या तरुणाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,माझ्या मोबाईलवरील रिल्स मध्ये असलेल्या एका व्हिडीओत
काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार करण ससाणे यांच्या प्रचारासाठी वार्ड नंबर 2 मधील मतदारांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी एकेरी उल्लेख करत अवमान केला होता. मुस्लिम बांधवांना खुश करण्यासाठी व नगरपालिका  निवडणूकित पक्षाला त्याचा फायदा होण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवामानकारक उल्लेख करत इतर धर्मियांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल द्वेषभाव व शत्रुत्व निर्माण होईल असे विधान केले म्हणून सचिन गुजर याचे विरोधात तक्रार दाखल करण्यात येत आहे. सदर फिर्यादीवरूनश्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय सहिता 353(2) प्रमाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!