नगरपरिषद कर्मचाऱ्याकडून प्रचाराच्या परवानग्या;आ.ओगलेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रांताधिकाऱ्यांकडून कारवाईचे आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने सर्व परवानग्या या आचारसंहिता कक्ष प्रांतकार्यालय यांच्याकडे नोंदवून देण्यात येतात.असे असतानाही दि.28 रोजी श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयात...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने सर्व परवानग्या या आचारसंहिता कक्ष प्रांतकार्यालय यांच्याकडे नोंदवून देण्यात येतात.असे असतानाही दि.28 रोजी श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयात लेबर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने परस्पर नवीन रजिस्टर तयार करून काही विशिष्ट पक्षाचे अर्ज स्वीकारून त्यांना परवानग्या दिल्या.याची माहिती आ. हेमंत ओगले यांना मिळाल्यावर त्यांनी या प्रकारचा जाब विचारण्यासाठी थेट प्रांत कार्यालय गाठले. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या कानावर सदर बाब घातल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन आ. ओगले यांना दिले.यावेळी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार करण ससाणे हेही उपस्थित होते.


याबाबत आ.हेमंत ओगले यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले की,सर्व परवागन्यांचे अर्ज हे आचारसंहिता कक्ष येथील रजिस्टरमध्ये नोंदणी अपेक्षित होते. परंतु परस्पर काही ठराविक पक्षाच्या लोकांना एकाच दिवसाच्या सर्व मुख्य ठिकाणी प्रचाराच्या परवानगी देण्याच्या उद्देशाने आचारसंहिता कक्षाला दुर्लक्षित करून परस्पर नवीन रजिस्टर करून सभा व पदयात्रा यांच्या परवानगी दिली आहे. सदरची बाब ही अत्यंत गंभीर असून निवडणूक प्रक्रियेला बाधा देणारी आहे.नगरपालिका कर्मचाऱ्याने परस्पर आचारसंहिता कक्ष व्यतिरिक्त नवीन रजिस्टर तयार करून ठराविक पक्षाच्या लोकांच्या परवानगी नोंदविल्या. त्यांनी परस्पर नगरपालिकेत नवीन रजिस्टर करून त्यामध्ये नोंदवून सभेच्या परवानगी दिली आहे. ही सगळी बाब गंभीर आहे. तसेच ही बाब आमदार ओगले आणि ससाणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील यांनी तातडीने संबंधितांवर विरोधात कारवाई करण्याचे आश्वासित केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!