माजी खा.विखे यांचा शिवसेनेला धक्का;माजी उपनगराध्यक्ष छल्लारे यांच्यासह काँग्रेसचे धालपे भाजपात

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अगदी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारे माजी नगरसेवक संजय छल्लारे यांनी आज दि.१७ रोजी उमेदवारी...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अगदी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारे माजी नगरसेवक संजय छल्लारे यांनी आज दि.१७ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या समवेत नुकतेच काँग्रेस पक्षात गेलेले मर्चंटचे संचालक दत्तात्रय धालपे यांनीही भाजपत प्रवेश केला. मा. खा. सुजय विखे पाटील यांनी दोघांचेही पक्षात स्वागत केले.तसेच माजी नगरसेवक संजय छल्लारे यांची प्रभाग १५ मधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून विखे पाटील यांनी घोषणा केली.
नगरपालिका निवडणूक जशी जवळ येत आहे.तशा नाट्यमय राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेते मंडळींचे पक्षांतर सुरूच होते.गेल्या ८ दिवसांपूर्वी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसवासी झालेले मर्चंटचे संचालक दत्तात्रय धालपे यांनी भाजपात उडी घेतली.सुमारे दीडएक वर्षांपूर्वी काँग्रेस मध्ये असलेले श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी सुरवातीला उबाठा शिवसेनेत प्रवेश केला.मग निवडणूकीच्या तोंडावर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा आपल्या हातात घेतला. त्यांनंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपत प्रवेश केला आहे.माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे व मर्चंटचे संचालक दत्तात्रय धालपे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!