भाजप-राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी श्रीनिवास बिहाणी रिंगणात; शिवसेनेची चित्ते तर उबाठाची थोरे यांना उमेदवारी;नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत
श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा सस्पेन्स अखेर संपला असून काँग्रेसच्या करण ससाणे यांच्या विरोधात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी...
श्रीरामपूर- श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा सस्पेन्स अखेर संपला असून काँग्रेसच्या करण ससाणे यांच्या विरोधात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांना रिंगणात उतरवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश चित्ते हे तर उबाठा सेनेकडून अशोक थोरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीची आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी औपचारिक घोषणा करण्यात आली.यात भाजप २२ तर राष्ट्रवादी १२ नगरसेवक पदावर निवडणूक लढणार आहे.शिवसेना शिंदे गटाने अखेर महायुतीपासून पूर्णपणे फारकत घेतली आहे.
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस,भाजप,उबाठा, शिंदे सेना यांच्या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष व बसपाही निवडणूकीच्या रणांगणात उतरले आहेत. शिंदे सेनेकडून इतर पक्षात उमेदवारी न मिळालेल्यांना शेवटच्या क्षणी आपल्या पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आल्याने त्यांनी सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत.शिंदे सेनेकडून प्रकाश चित्ते आणि दिपाली चित्ते यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या सून मंजूश्री मुरकुटे (प्रभाग ११) यांच्यासह सागर बेग यांच्या समर्थकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस कडून ससाणे गटाने सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासह नगरसेवकांच्या उमेदवारीची यादी अंतिम केलेली असल्याने त्यांची मोर्चेबांधणी आधीच पूर्ण होती. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये युतीचा ‘फॉर्म्युला’ उशिरा ठरल्याने अनेक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. भाजपने राष्ट्रवादीला मुस्लिम बहुल प्रभागांसह १२ जागा दिल्या. माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्रभाग ३ मधून नगरसेवक पदासाठी अर्ज भरला आहे.
४० वर्षे काही केलं नाही आता काय करणार?-डॉ. विखे पाटील शिंदे शिवसेनेना सतत आपली भूमिका बदलत राहील्याने आम्ही अखेर त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. श्रीरामपूरला विकासात्मक चेहरा हवा आहे. श्रीरामपूरला यापूर्वी प्रत्येक निवडणुक जातीय समिकरनांवर लढवली गेली.आमचा मात्र कुठल्याही जातिय समिकरणावर विश्वास नाही. ४० वर्षे जे काही करू शकले नाहीत ते आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार होऊन काय करणार? असा सवालही मा.खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.
भाजप–राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवू-आदिक पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मा खा.डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत युतीची चर्चा पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादीला १२ जागा आणि अध्यक्षपदासह भाजपला २२ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना युतीपासून बाजूला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जावू,असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी सांगितले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा
श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद
श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी