श्रीरामपूरात नगराध्यक्षापदासाठी ४ तर नगरसेवकपदासाठी १० उमेदवारांचे अर्ज दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारी गती मिळाली असून नगराध्यक्षापदासाठी तब्बल चार जणांनी, तर नगरसेवक पदासाठी दहा उमेदवारांनी...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारी गती मिळाली असून नगराध्यक्षापदासाठी तब्बल चार जणांनी, तर नगरसेवक पदासाठी दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली.

घोलप यांनी सांगितले की, नगराध्यक्षा पदासाठी संजय छल्लारे, अशोक थोरे, निलेश भालेराव आणि जोएफ शेख या चार उमेदवारांनी अधिकृतरीत्या अर्ज दाखल केले आहेत.  दरम्यान, नगरसेवक पदासाठी एकूण १० अर्ज दाखल केले, त्यामध्ये वसंत कोल्हे, रोहित शिंदे, जावेद पठाण, रवींद्र खिलारी, वैशाली पोटे, प्रसाद चौधरी, स्नेहल खोरे, निलोफर शेख, प्रकाश अहिरे आणि दिपाली मोरगे या उमेदवारांचा समावेश आहे. आगामी काही दिवसांत आणखी काही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगराध्यक्षा आणि नगरसेवक पदांची लढत अधिक रोचक होण्याचे संकेत मिळत आहेत. शहरातील मतदारांची भूमिका, स्थानिक राजकीय समीकरणे आणि विविध गटांतील अंतर्गत हालचाली यावरच या निवडणुकीचा अंतिम निकाल मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!