श्रीरामपुरात गावठी कट्टयासह तीन जण जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 7 लाख 82 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

श्रीरामपूर-श्रीरामपुर शहरातील बेलापुर रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन तीन जणांना गावठी कट्टयासह जेरबंद केले आहे.त्यांच्याकडून 7 लाख 82 हजार...

श्रीरामपूर-
श्रीरामपुर शहरातील  बेलापुर रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन तीन जणांना गावठी कट्टयासह जेरबंद केले आहे.त्यांच्याकडून 7 लाख 82 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघांविरोधात श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना  मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तीन जण हे त्यांच्याकडील कारमधुन गावठी कट्टा विक्री करीता बेलापुर या ठिकाणावरुन श्रीरामपुरकडे येणार आहेत.त्यानुसार त्यांनी पोलीस पथकास तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश दिले.पथकाने मिळालेल्या माहितीचे आधारे श्रीरामपुर ते बेलापुर जाणारे रोडवर अनारसे हॉस्पीटलचे समोर रोडलगत सापळा रचला. काही वेळाने नमूद वाहन येताना दिसले. पथकाने सदर वाहन थांबवुन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे आनंदा यशवंत काळे वय – 44 वर्षे, रा. रेणुकानगर, 51 नं. रेल्वे गेट जवळ, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर, विशाल बबन सोज्वळ वय – 28 वर्षे, रा. रेणुकानगर, दत्तनगर रोड, विश्वकर्मा मंदीराचे पाठीमागे श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर, विजय यशवंत काळे वय – 48 वर्षे, रा. निलकंठ ड्रिमस् शांताई रेसिडेन्सी शेजारी, थत्ते ग्राऊंड, वार्ड नं. 7 श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर अशी असल्याचे सांगितले.त्यांच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता कारच्या डॅशबोर्डचे डिक्कीमध्ये 35,000 रुपये किमतीचा 1 गावठी कट्टा (अग्निशस्त्र), 2000/- रुपये किमतीचे 4 जिवंत काडतुसे,, 7,00,000 रुपये किमतीची होंडा कंपनीची होंडा सिटी कार क्रमांक एम.एच. 03 सी.एस.9466, 45,000/- रुपये किमतीचे 3 मोबाईल असा एकुण 7,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तिन्ही आरोपींना मुद्देमालासह श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करुन त्यांचेविरुध्द पोकॉ/203 रमिझराजा रफिक आतार नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 1010/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.ताब्यात घेण्यात आलेला आरोपी आनंदा यशवंत काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याच्याविरुध्द अनेक गुन्हे दाखल आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!