चॅप्टर केसेस मधील प्रतिबंधक कारवाईद्वारे १६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी;अपर पोलीस अधीक्षक यांची धडक कारवाई

श्रीरामपूर-कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी चॅप्टर केसेस प्रकरणी सुनावणी घेवुन रेकॉर्डवरील १६ गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली...

श्रीरामपूर-
कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी चॅप्टर केसेस प्रकरणी सुनावणी घेवुन रेकॉर्डवरील १६ गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी गुन्हेगारांविरुद्ध अतिशय प्रभावीपणे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून आपल्या अधिकारांचा प्रभावीपणे वापर करत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच इतकी मोठी कारवाई आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
अपर पोलीस अधीक्षक यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन घोषीत करण्यात आले आहे. त्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२६,१२७,१२८,१२९ खालील चॅप्टर केसेसचे कामकाज त्यांच्यासमक्ष चालते. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १६३ खालील प्रवेशबंदी प्रस्तावांवर देखील कार्यकारी दंडाधिकारी यांचेपुढे कामकाज होते.आपल्या हद्दीतील विविध पोलीस स्टेशनकडुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या चॅप्टर केसेस अपर पोलीस अधीक्षक यांचेपुढे पाठविण्यात आल्या होत्या. त्यात सुनावणी अंती १६ रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. यापैकी काही जणांनी बंधपत्र करुन देण्यासाठी जामीनदार हजर केले नाहीत तर काहींनी बंधपत्र केल्यानंतर पुन्हा बंधपत्राचे उल्लंघन करुन नव्याने गुन्हे केले आहेत.त्याअनुषंगाने या १६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे.

आगामी निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर ५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर चॅप्टर केसेसखाली भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२९ अन्वये कारवाई करून अहवाल सादर करण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश दिलेले होते.
त्याअनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी
जयदत्त भवर, कुणाल सोनवणे,अमोल भारती  यांनी आपआपल्या विभागातील  पोलीस स्टेशनला ५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांचे श्रीरामपुर शहर, संगमनेर शहर, राहुरी, कोपरगाव शहर, लोणी पोलीस स्टेशन यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केले होते

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!