श्रीरामपूरात महाविकास आघाडीत मिठाचा खडा; नगरपालिका निवडणूकित उबाठा आणि काँग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपालिका निवडणूकित महाविकास आघाडी मध्ये मिठाचा खडा पडला आहे.महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि उबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिका निवडणूकित महाविकास आघाडी मध्ये मिठाचा खडा पडला आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि उबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या सर्वच्या सर्व जागी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांनी आज श्रीरामपूर येथे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
त्यामुळे श्रीरामपूरात काँग्रेस आणि उबाठा सेनेत ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार असल्याचे आज निश्चित झाले आहे.

काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून डावलले जात असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा निर्णय जाहीर केला.काँग्रेस आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि जिल्हाध्यक्ष सचिन कोते, तालुकाध्यक्ष लखन भगत, जेष्ठ नेते अशोक थोरे यांच्यात झालेल्या जागावाटपाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीतर स्वबळावर लढा’, असा आदेश उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी दिला होता.त्याप्रमाणे काँग्रेस आणि सेनेच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली.शिवसेनेला जागा देताना काँग्रेसने कमी लेखल्याने शिवसेनेने आपला निर्णय जाहीर केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत तालुकाध्यक्ष लखन भगत म्हणाले की, पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासह १७ प्रभागांसाठी एकूण ३४ उमेदवारांचे पूर्ण पॅनल उभे केले जाणार आहे. दोन्ही मित्रपक्षांचे उमेदवार समोरासमोर निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने, याचा थेट परिणाम निवडणूकीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. या ‘मैत्रीपूर्ण लढती’मुळे मतांचे विभाजन होणार आहे.दरम्यान ज्या महायुतीच्या फुटीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या ती महायुती आता एकसंघ दिसत असून उलटपक्षी सुरवातीला एकत्र दिसणाऱ्या महाविकास आघाडीतच फूट पडल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!