काँग्रेसकडून करण ससाणे नगराध्यक्षपदाच्या रणांगणात;महायुतीचा उमेदवार उद्या ठरणार

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी महाआघाडीच्या वतीने काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, अशी माहीती निवडणूक...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी महाआघाडीच्या वतीने काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, अशी माहीती निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील यांनी दिली.दरम्यान उबाठा शिवसेनेकडून स्वबळावर नगरपालिका निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आल्याने नगराध्यक्षपदासाठी ससाणे यांच्यापुढे महाविकास आघाडीतूनच आव्हान निर्माण झाले आहे. त्यावर काँग्रेस व करण ससाणे कशी मात करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एकीकडे आघाडीच्या वतीने काँग्रेसने ससाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अजूनही ठरताना दिसत नाही. अर्ज दाखल करण्यास अवघे 2 दिवस उरलेले असताना महायुतीचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरूच आहे.आज रात्री किंवा उद्यापर्यंत महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा होणे अपेक्षित असून त्या दृष्टीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे.शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली जावी असा आग्रह होत असल्याचे समजते.श्रीरामपूरसह राज्यातील इतर चार नगरपालिकाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही नगराध्यक्षपदावर दावा केला जात असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यासाठी आग्रही आहेत,अशी माहिती मिळाली आहे.माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक ह्या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी सर्वांनी नगराध्यक्ष पदावर दावा कायम ठेवल्याने नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर बंडोबांना थंड करण्याचे आव्हानही महायुतीपुढे असणार आहे.श्रीरामपूरात आघाडी व युती होते किंवा नाही याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र, आपल्यालाच उमेदवारी मिळणार आविर्भावात अनेकांनी आपला प्रचार सुरू केला आहे.काहीजण नगराध्यक्षपदासाठी अपक्षही लढू शकतात, असा कयास बांधला जात आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!