खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला बेड्या,अपर अधीक्षक कार्यालयाची कारवाई

श्रीरामपूर-शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयामधील फरार आरोपीस बेड्या ठोकण्यास पोलिसांना यश आले आहे.अजय बापुसाहेब कुऱ्हाट असे या आरोपीचे...

श्रीरामपूर-
शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयामधील फरार आरोपीस बेड्या ठोकण्यास पोलिसांना यश आले आहे.अजय बापुसाहेब कुऱ्हाट असे या आरोपीचे नाव असून त्याला अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने अटक करून शनी शिंगणापूर पोलिसांच्या हवाली केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,पोलीस अधीक्षक
सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी विविध गुन्ह्यातील  फरार व पाहिजे असलेल्या आरोपिंचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याची मोहिम हाती घेतली आहे.त्या अनुषंगाने दिनांक ११/११/२०२५ रोजी सकाळी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, यांना गोपनीय माहिती मिळाली की, शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन गु.र.नं.२४८/२०२५ भा.न्या.सं. कलम १०९,११८(१),११५(२),१८९ (२), १८९ (४) आर्म अॅक्ट ४/२५,७ या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयामधील फरार आरोपी अजय बापुसाहेब कुऱ्हाट हा शिंगणापुर येथे लपुन बसला आहे. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे यांना सदर आरोपीचा शोध घेवुन त्यास तात्काळ ताब्यात घेणेकरीता त्यांनी आदेश दिले.

त्यानंतर नमुद पथकाने शनिशिंगणापुर येथे जावुन आरोपी याचा मिळालेल्या गोपनीय माहितीचे व तांत्रिक विश्लेषनाचे आधारे शोध घेतला असता आरोपी अजय बापुसाहेब कुऱ्हाट, वय २१ वर्ष, रा.शिंगणापुर, ता. नेवासा हा मिळुन आला आहे. सदर आरोपी हा शनिशिंगणापुर पोलीस स्टेशनला दाखल खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयामधील पाहिजे असल्याने सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्यास शनिशिंगणापुर पोलीस स्टेशनकडे सुपूर्त केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. अशिष शेळके, शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!