दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सोहळा

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक माजी नगरसेवक पक्षांतर करताना दिसत आहेत. आजही दोन माजी नगरसेवकांसह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक माजी नगरसेवक पक्षांतर करताना दिसत आहेत. आजही दोन माजी नगरसेवकांसह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.मुक्तागिरी या शासकीय बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला. माजी नगरसेवक मल्लू शिंदे आणि माजी नगरसेविका कुसूम शिंदे या दोघांसह सौ. रेखा सूर्यभान शेळके, सूर्यभान
शेळके, रवि गरेला, रमेश डुकरे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.या सर्वांच्या प्रवेशामुळे शहरात शिवसेनेला बळकटी मिळणार असल्याची चर्चा आहे.
यावेळी शिवसेनेचे महासचिव राम रेपाळे, संपर्क प्रमुख जनार्दन गालपगार, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे नेते प्रकाश चित्ते, सुनील मुथ्था, माजी नगरसेवक किरण लुणीया, अशोक कारखान्याचे संचालक बबन मुठे, राजेंद्र कांबळे आदींसह प्रमुख या प्रवेशावेळी हजर होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे दोन माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!