जमीन व्यवहार फसवणूक;माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांच्यावर गुन्हा दाखल;न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

श्रीरामपूर-श्रीरामपुरात जमिनीच्या वादातून बोगस दस्त नोंदवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. येथील शेतकरी दीपक लक्ष्मण डावखर (वय...

श्रीरामपूर-
श्रीरामपुरात जमिनीच्या वादातून बोगस दस्त नोंदवून  कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. येथील शेतकरी दीपक लक्ष्मण डावखर (वय ५३) यांनी आपल्या आई, बहिणी, मेहुणे तसेच शहरातील माजी उपनगराध्यक्ष व काही उद्योजकांविरुद्ध फसवणूक व धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.दीपक लक्ष्मण डावखर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील जुना गट नं. ८१/१, व नवीन गट क्र. १००/९ मधील क्षेत्रफळ ३.७१ हेक्टर शेतजमीन वडील लक्ष्मण परशुराम डावखर यांच्या सन २०११ मधील मृत्यूपत्राद्वारे त्यांच्या नावावर झाली होती.या जमिनीचा 7-12 उतारा व मालकी नोंद आजही त्यांच्या नावावर आहे. तरीसुद्धा कुटुंबातील काही सदस्यांनी आणि बाहेरील उद्योजकांनी संगनमत करून कोर्टाच्या स्थगिती आदेशाची पायमल्ली करत खोटा आपसमजूतीचा करार नोंदवला.
सदर प्रकरणात डावखर यांच्या फिर्यादीवरून वैशाली शिवराम साठे, अर्चना भास्कर दिघे, जनाबाई ऊर्फ
बबई लक्ष्मण डावखर, सुशिलाबाई लक्ष्मण डावखर, अनिल माणिक इंगळे, विलास अशोक ससे, शेख अंजुम
परवेज मुसा अहमद या सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता संहिता ३६४ ए,४२०, ४०६, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये माजी नगरसेवक अंजुम शेख यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असता त्यांना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर न्यायालयाने मंजूर केला आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!