वर्षभरात मी मंजूर केलेल्या विकासकामांचीच उद्घाटने;मा.आ.कानडेंनी साधला आ.ओगले यांच्यावर निशाणा

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जनतेने मला नाकारलं असलं तरी ज्या नुतन लोकप्रतिनिधीला इथल्या जनतेने निवडून दिले त्यांनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात कुठलंच नवीन विकास...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील जनतेने मला नाकारलं असलं तरी ज्या नुतन लोकप्रतिनिधीला इथल्या जनतेने निवडून दिले त्यांनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात कुठलंच नवीन विकास काम मंजूर करून आणलेले नाही.माझ्या कार्यकाळात मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचीच उद्घाटने करण्याचाच धडाका त्यांनी सुरू ठेवला आहे,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,माजी आमदार लहू कानडे यांनी नाव न घेता विद्यमान आमदार हेमंत ओगले यांच्यावर केली.आपल्या यशोधन कार्यालयातील दिवाळी फराळ कार्यक्रमात कानडे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगततातून विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्याशी काँग्रेस पक्ष आणि इथल्या नेतेमंडळींनी कशा प्रकारे दगाफटका केला याचे विवेचन केले.याप्रसंगी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सचिन जगताप, अशोक कानडे,अंकुश कानडे, कैलास बोर्डे,राजेंद्र कोकणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मा.आ. कानडे पुढे म्हणाले की,गेल्या वर्षभरात निवडून आलेले लोकप्रतिनिधी काय काम करतात याकडे मी बारीक लक्ष ठेवून होतो.मी बोलायचंच नाही असे ठरवले होते परंतु आता तालुक्यातील जनतेसाठी मला आजपासून पुन्हा बोलावंच लागणार आहे.श्रीरामपूरच्या विकासात अडथळा आणण्याचे प्रकार जनतेला दिसत आहेत.२०१९ ते २०२४ या कालावधीत आम्ही १३oo कोटी रुपयांचा विक्रमी निधी आपण मतदारसंघात आणला.आणलेला निधी त्याच कामासाठी वापरला गेला. २२o केव्हीए सबस्टेशन, बसस्थानक सुशोभीकरण व रस्त्यांची कामे आपणच मंजूर करून आणली होती. आज त्याच कामांची उद्घाटने नव्या लोकप्रतिनिधीकडून केली जात आहेत.नव्याने कुठलेच काम मंजूर करण्यात आलेले नाही.श्रीरामपूरातील अनेक शासकीय कार्यालयांत आता ‘गमती जमती’ सुरू झाल्या आहेत.त्या मी पाहतोय योग्य वेळ आल्यावर त्यावर बोलणार आहे.
मी निवडून आल्यानंतर माझ एक छोटासा हट्ट होता की मी या तालुक्यातील जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलोय मला नेता नाही व्हायचं परंतु किमान आमदार म्हणून तरी मला माझ्या पध्दतीने काम करू द्या.परंतु त्याला प्रस्थापित नेतेमंडळींनी विरोध केला,अशी
टिकाही कानडे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या करण ससाणे गटावर केली.आपलं नेतृत्व रुजू द्यायचेच नाही हा अनेकांचा हेतू होता.मी ठरवलं असत तर भाजप किंवा शिवसेना अशा कुठल्याही पक्षात जाऊन त्यांचे तिकीट मिळवू शकलो असतो,परंतु आपण तसे केले नाही.अखेरीस काँग्रेस पक्षाने ज्या पाच विद्यमान आमदारांची तिकिटे कापली त्यात आपलाही समावेश झाला.तरीही येणाऱ्या काळात मी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत इथल्या जनतेची सेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा योग्य सन्मान राखला गेला नाही तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नगरपालिका,जि. प.व पंचायत समितीच्या निवडणूका स्वबळावर लढवल्या जातील,असेही कानडे शेवटी म्हणाले.

यशोधन कार्यालयात आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात बोलताना मा. आ. लहुजी कानडे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!