श्रीरामपूर बस आगारात स्लॅबचा तुकडा कोसळून महिला गंभीर जखमी;एस.टी.महामंडळाचे दुर्लक्ष

श्रीरामपूर-श्रीरामपूर येथील एस.टी. बस आगारातील दुर्लक्षित स्थितीमुळे आज सायंकाळी एक गंभीर अपघात घडला. जर्मन हॉस्पिटल जवळील महानुभाव आश्रमातील शिष्य प्रांजलगुरु लक्ष्मीबाई...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर येथील एस.टी. बस आगारातील दुर्लक्षित स्थितीमुळे आज सायंकाळी एक गंभीर अपघात घडला. जर्मन हॉस्पिटल जवळील महानुभाव आश्रमातील शिष्य प्रांजलगुरु लक्ष्मीबाई पंजाबी या पुणतांब्याकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत असताना त्यांच्या डोक्यावर अचानक स्लॅबचा तुकडा कोसळला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून तीव्र रक्तस्रावामुळे त्या घटनास्थळीच बेशुद्ध पडल्या होत्या.अपघातानंतर त्यांना तत्काळ साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर रफिक शेख यांच्या देखरेखीखाली सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी एस.टी. आगारातील एकही जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी रुग्णालयात जखमी प्रांजलगुरु लक्ष्मीबाई यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करत उपचाराची माहिती घेतली व म्हटले की,हा अपघात महामंडळाच्या हलगर्जीपणामुळेच घडला आहे. जखमी महिलांचा संपूर्ण उपचार खर्च महामंडळाने उचलावा. तसेच बस आगारातील जीर्ण इमारतींची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांतर्फे तीव्र आंदोलन उभारले जाईल.दरम्यान, दिवाळीच्या अगोदरच श्रीरामपूर, संगमनेर व नेवासा या तीन बस डेपोंमध्ये डिझेल टंचाईमुळे अनेक बसेस बंद ठेवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे.यावेळी राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवाजी दांडगे सिद्धार्थ युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल कुमार मिसाळ आदी उपस्थित होते.

रुग्णालयात दाखल प्रवाशी महिलेची सुभाष त्रिभुवन व बाबा शिंदे यांनी भेट घेत सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!