भाजपचे प्रकाश चित्ते यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश; श्रीरामपूरात नगरपरिषद निवडणूकीच्या तोंडावर मोठी राजकीय उलथापालथ

श्रीरामपूर-नितीन शेळकेश्रीरामपूर तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाचा चेहरा राहिलेले,भाजपच्या प्रदेश ओबीसी सेलचे माजी उपाध्यक्ष,हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांनी आपल्या सुमारे दोनशेहुन अधिक...

श्रीरामपूर-नितीन शेळके
श्रीरामपूर तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाचा चेहरा राहिलेले,भाजपच्या प्रदेश ओबीसी सेलचे माजी उपाध्यक्ष,हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांनी आपल्या सुमारे दोनशेहुन अधिक कार्यकर्त्यांसह ठाणे येथे स्व. गंगुबाई शिंदे सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर या पक्षप्रवेशाने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ झाली असून भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.पक्षाने चित्ते यांच्या रूपाने शहरातला मोठा ओबीसी चेहरा गमावला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.या प्रवेशामुळे नगरपरिषद निवडणूकितील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.दरम्यान शिंदे यांची शिवसेना नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असून प्रकाश चित्ते हे नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.भाजप पक्षांतर्गत कुरघोड्या आणि गटबाजीमुळे चित्ते यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा त्यांच्या शिवसेनेतील प्रवाशानंतर सुरू झाली आहे.
काल दि.१८ रोजी सायंकाळी मुंबई येथे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत प्रकाश चित्ते यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेना प्रवेश निश्चित झाला होता.आज दि.१९ रोजी ठाणे येथे त्यावर शिक्कामोर्तब झाले.याप्रसंगी तालुका संपर्कप्रमुख जनार्दन लाल पगार,संजय पांडे, राजेंद्र कांबळे, माजी नगरसेवक किरण लुनिया,बबन मुठे, सोमनाथ कदम, संजय रुपटक्के आदींसह सुमारे दोनशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रकाश चित्ते यांच्या प्रवेशामुळे श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.चित्ते हे अहिल्यानगर जिल्ह्यात कडवट हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांनी निर्माण केलेले आहे.येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक आपण कुठल्याही परिस्थितीत लढवणारच असा निर्धार त्यांनी नुकताच व्यक्त केला होता.आता शिंदे शिवसेना स्वतंत्ररित्या निवडणूकिला सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे.यात प्रकाश चित्ते हेच नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार असण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे.दरम्यान प्रकाश चित्ते यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसमवेत काही दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन नव्याने भाजपात प्रवेश केलेल्या नेते मंडळींकडून समर्पित भाजप कार्यकर्त्यांवर श्रीरामपूर तालुक्यात कसा कसा अन्याय केला जात आहे,हे सांगितले होते. त्यावर महाजन यांनी त्यांना सर्व काही ठीक होईल असे आश्वासन दिले होते.त्यांनंतर थोड्याच दिवसांत प्रकाश चित्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.या आगोदर मा.आ.भानुदास मुरकुटे, श्रीराम संघाचे सागर बेग,मा.उपनागराध्यक्ष संजय छल्लारे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणाऱ्या निवडणुकांच्या काळात तालुक्यातील या सर्व नेत्यांची मोट कशा पद्धतीने बांधतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

प्रकाश चित्ते यांनी कार्यकर्त्यांसह ठाणे येथे स्व. गंगुबाई शिंदे सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!