खानापूर परिसरात तीन बिबटे अडकले पिंजऱ्यात;बिबट्यांच्या दहशतीतुन शेतकरी व विद्यार्थ्यांची अखेर सुटका

श्रीरामपूर –श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर परिसरात भामाठान-खानापूर रस्त्यावर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सलग तीन दिवस तीन बिबटे अडकले आहेत.त्यामुळे परिसरातील शेतकरी व...

श्रीरामपूर –
श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर परिसरात  भामाठान-खानापूर रस्त्यावर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सलग तीन दिवस तीन बिबटे अडकले आहेत.त्यामुळे परिसरातील शेतकरी व शाळकरी मुलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरलेली होती.शेतकऱ्यांना शेतात दिवसा काम करणे देखील कठीण होऊन बसले होते. दुधाळ जनावरांना चारा आणण्यासाठी दररोज शेतात जाताना महिला वर्गही घाबरत होता.खानापूर शिवारात भामाठाण रस्त्यावर शाळकरी मुलांना रस्त्यावरून तीन बिबटे जाताना दिसले होते. त्यामुळे धास्तावलेल्या आजूबाजुच्या वस्त्यावरील शेतकऱ्यांनी ही वार्ता  पशुवैद्यकीय डॉ. दादासाहेब आदिक यांच्या कानावर घातली त्यांनी वनरक्षक राहुल कानडे यांच्याशी संपर्क साधला. वन विभागाच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे पिंजरा एका स्पॉटवर आहे. त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या वाहनातून पिंजरा घेऊन जावा लागेल, असे सांगण्यात आले. खानापूरच्या तरूणांनी टॅक्टर ट्रॉलीमधून बोरावके फार्म ब्राम्हणगाव शिवार येथून पिंजरा आणला व पिंजरा बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात लावण्यात आला. भाऊसाहेब जोर्वेकर यांनी बिबट्या ला भक्ष्य म्हणून आपला बोकड आणून पिंजऱ्यात ठेवला.अखेर शनिवार दि. १८ रोजी पहाटे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी पिंजरा जागेवर ठेवून दुसऱ्या पिंजऱ्यात बिबट्यास नेले. दुसऱ्या दिवशी रविवारी दि. १९ रोजी पहाटे पुन्हा एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान खानापूरसह गोदावरी नदीच्या काठावरील दोन्हीही बाजूच्या गावांत अलीकडच्या काळात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!