भाजपच्या प्रयत्नांना यश; जलसंपदा मंत्र्यांकडून श्रीरामपूरला तात्काळ पाणीपुरवठ्याचे आदेश

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचे संकट गडद झाले असताना, भाजपच्या सक्रिय पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून...

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचे संकट गडद झाले असताना, भाजपच्या सक्रिय पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरला तात्काळ पाणी सोडण्याचे स्पष्ट आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावामध्ये सध्या केवळ एक दिवसपुरेल एवढा पाणीसाठा उरला असून, यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण होते. वाढत्या उष्णतेमुळे व पावसाअभावी तलावातील जलसाठा कमी होत गेला असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

ही स्थिती लक्षात घेता, भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबईतील रॉयलस्टोन निवासस्थानी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन श्रीरामपूरसाठी तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची विनंती केली. या शिष्टमंडळात भाजपा अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बंडूकुमार शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या मागणीची गांभीर्याने दखल घेत नामदार विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्याशी थेट संपर्क साधून श्रीरामपूरला तत्काळ पाणी सोडण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे श्रीरामपूरकर नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या शिष्टमंडळाने वेळेवर केलेली ही भेट अत्यंत परिणामकारक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून, जनतेच्या मूलभूत गरजांकडे शासनाचे लक्ष वेधून तातडीने कृती घडवून आणण्यात भाजप यशस्वी ठरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. शहरामध्ये मागील काही आठवड्यांपासून होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते. तलावातील जलसाठा संपत चालल्याने संभाव्य आरोग्यविषयक आणि नागरी अडचणी लक्षात घेता भाजपने हा पुढाकार घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी शासन दरबारी एकसंघ स्वरूपात पाठपुरावा करण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना, श्रीरामपूर शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर काही प्रमाणात तोडगा निघाला असून, यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, ही समस्या फक्त तात्पुरत्या उपायांनी सुटणार नसून, भविष्यातील गंभीर पाणीटंचाई टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज अधिक तीव्रतेने अधोरेखित झाली आहे. शासन व स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वयातून आगामी काळात स्थायी स्वरूपाचा पाणीपुरवठा आराखडा तयार करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!