श्रीरामपूर नगरपरिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर;इच्छुकांसाठी ‘कही खुशी कही गम’चे चित्र

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे.आज दि.८ रोजी सकाळी ११.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, श्रीरामपूर येथे प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे.आज दि.८ रोजी सकाळी ११.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, श्रीरामपूर येथे प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली.नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उप मुख्यधिकारी महेंद्र ताकपिरे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली.या नवीन प्रभागनिहाय आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य आता निश्चित झाले आहे.शहरातील राजकीय समीकरणेही मोठ्या प्रमाणावर बदलली गेली आहेत.अनेक प्रभागात काही इच्छुकांच्या मनासारखेच आरक्षण निघाल्याने त्यांना आनंदाचे भरते आले. त्यांनी आतापासूनच निवडणूकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. तर ज्यांच्या प्रभागात मनासारखे आरक्षण निघाले नाही त्यांनी ‘पुढच्या वेळी’ असे म्हणत आपल्या मनाची समजूत घातली आहे.प्रभाग निहाय आरक्षण सोडत झाल्याने आता नगरपरिषद निवडणूक प्रकियेला वेग आला असून यानिमित्ताने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघायला सुरुवात झाली आहे.
आरक्षण सोडतवेळी भाजप,काँग्रेस, शिवसेना,राष्ट्रवादी,मनसे, आरपीआय या प्रमुख पक्षांसह अन्य छोटे मोठे पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वीच नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटातील व्यक्ती साठी खुले झाले आहे.आता प्रभाग निहाय आरक्षण सोडत निघाल्याने नगरसेवकपदी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे..
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय पडलेले आरक्षण पुढील प्रमाणे-
प्रभाग क्रमांक  1 अ – ओबीसी पुरुष – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक  2 अ – अनुसूचित जाती महिला  ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक  3 अ – अनुसूचित महिला  – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक  4 अ – ओबीसी पुरुष – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक  5 अ – ओबीसी महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक  6 अ – ओबीसी – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक  7 अ – अनुसूचित जाती  – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक  8 अ – ओबीसी महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक  9 अ – ओबीसी – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक  10 अ – अनुसूचित महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक  11 अ – ओबीसी महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक  12 अ – अनुसूचित जाती – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक  13 अ – सर्वसाधारण  ब – अनुसूचित जमाती महिला
प्रभाग क्रमांक  14 अ –  अनुसूचित जाती – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक  15 अ – सर्वसाधारण  – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक  16 अ – ओबीसी महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक  17 अ – ओबीसी महिला – ब – सर्वसाधारण

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!