शिर्डीतील शिव महापुराण कथा देशातील सर्वात मोठी ठरणार; डॉ.सुजय विखे पाटील यांचा विश्वास

श्रीरामपूर-शिर्डी येथे येत्या 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणारी शिव महापुराण कथा ही देशातील सर्वात मोठी व भव्यदिव्य ठरणार असल्याचा विश्वास...

श्रीरामपूर-
शिर्डी येथे येत्या 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणारी शिव महापुराण कथा ही देशातील सर्वात मोठी व भव्यदिव्य ठरणार असल्याचा विश्वास माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. या कथेचे आयोजन जनसेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून, उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध प्रवचनकार प्रदीप मिश्रा महाराज हे पाच दिवस भक्तांना अध्यात्मिक प्रवचनांनी मार्गदर्शन करणार आहेत.या कथेचे ठिकाण शिर्डी येथील अस्तगाव माथा परिसरात असणार असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, भाविकांसाठी बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पार्किंग आणि इतर सोयी-सुविधा जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.या कथेचे विशेष आकर्षण म्हणजे बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम दर्शनाचा देखावा, जो अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात साकारण्यात येणार आहे. देशभरातील विविध प्रांतांमधून येणाऱ्या भक्तांसाठी हा एक अनोखा आध्यात्मिक अनुभव ठरणार असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.११ ऑक्टोबर रोजी प्रदीप मिश्रा महाराजांचे शिर्डीत आगमन होणार असून, शिर्डी आणि राहता शहरात त्यांच्या स्वागतासाठी भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर ते लोणी येथील डॉ. विखे पाटील यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार असून, १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान दररोज दुपारी एक ते चार या वेळेत कथा होणार आहे.महाराष्ट्रात प्रदीप मिश्रा महाराजांची ही कथा विशेष ठरणार आहे, कारण पावसामुळे रद्द झालेल्या त्यांच्या पूर्वनियोजित तीन कथांनंतर हीच पहिली कथा महाराष्ट्रात पार पडणार आहे. मिश्रा महाराजांच्या प्रत्येक प्रवचनास तीन ते चार लाख भाविक उपस्थित राहतात, त्यामुळे या वेळी शिर्डीत लाखो भाविकांचा जनसागर उसळण्याची शक्यता आहे.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, शिर्डी येथील अस्तगाव माथा ही कथा ही केवळ धार्मिक सोहळा नसून, अध्यात्म आणि एकतेचा उत्सव ठरणार आहे. भक्तांसाठी हे एक अविस्मरणीय अध्यात्मिक पर्व असेल. देशातील सर्वात मोठी शिव महापुराण कथा म्हणून याची नोंद होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिर्डी व अहिल्यानगर जिल्हा पुन्हा एकदा भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेने उजळून निघणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!